Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘लस्ट स्टोरीज’मध्ये इंटीमेट सीनमुळे घाबरलेली भूमी; म्हणाली, ‘लोकांनी भरलेल्या खोलीत माझ्या शरीरावर…’

‘लस्ट स्टोरीज’मध्ये इंटीमेट सीनमुळे घाबरलेली भूमी; म्हणाली, ‘लोकांनी भरलेल्या खोलीत माझ्या शरीरावर…’

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या वाट्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा येतात. काही पात्रांमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळते, तर काही पात्र त्यांना अवघडलेपणामध्ये टाकतात. असाच एक रोल अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला मिळाला होता, ज्यामुळे ती फारच चिंतेत होती. ‘टॉयलेट एक प्रेम कथा‘, ‘दम लगा के हैशा’, ‘बधाई दो’ यांसारख्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या भूमीने ‘लस्ट स्टोरीज’ या सिनेमात मोलकरणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवला होता, ज्यात वेगवेगळ्या कहाण्या होत्या. यातीलच एकात भूमीचाही समावेश होता.

भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही ‘लस्ट स्टोरीज’ (Lust Stories) सिनेमातील तिच्या इंटीमेट सीनमुळे भलतीच चर्चेत आली होती. अशात नुकतेच तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, इतक्या साऱ्या लोकांच्या उपस्थितीत इंटीमेट सीन दिल्यामुळे ती किती चिंतेत पडली होती.

काय म्हणाली भूमी?
भूमी पेडणेकर ‘लस्ट स्टोरीज’ (Bhumi Pednekar Lust Stories) या सिनेमात ज्या सीरिजमध्ये दिसली होती, त्याचे दिग्दर्शन झोया अख्तर हिने केले होते. या सिनेमात भूमी एका मोलकरणीच्या भूमिकेत होती. या सिनेमात तिला मालकाची भूमिका साकारणारा अभिनेता नील भूपालम याच्यासोबत काही इंटीमेट सीन्स शूट करायचे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi ???? (@bhumipednekar)

याचबद्दल बोलताना भूमी किती चिंतेत पडली होती, हे तिने सांगितले. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, “जेव्हा मी लस्ट स्टोरीजमध्ये काम केले होते, तेव्हा खूपच चिंतेत पडले होते. त्यावेळी कोणीही इंटीमसी कोऑर्डिनेटर नव्हते. मात्र, झोया अख्तर हिने यादरम्यान आमची मदत केली. ती मला आणि नीलला तिच्यासोबत घेऊन गेली. ‘हे तुझ्याबद्दल नाहीये. तू स्वत:ला असं वाटून घे की, तू एक मुलगी आहे आणि तुला एका सहकलाकाराची गरज आहे,’ असे ती मला म्हणाली.”

पुढे बोलताना भूमी म्हणाली की, “परंतु मी खूपच चिंतेत होते. कारण, ती खोली लोकांनी भरलेली होती आणि मी शरीरावर न च्या बरोबर कपडे घातले होते. मात्र, तिथे संपूर्ण सुरक्षा होती आणि तांत्रिकरीत्या गोष्टीही ठीक होत्या. परंतु तरीही नील आणि मी बसून एकमेकांना हे सांगत होतो की, आपल्या या मर्यादा आहेत.” भूमीने ही मुलाखत बॉलिवूड हंगामाला दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi ???? (@bhumipednekar)

सिनेमातील कलाकार
भूमी पेडणेकर हिच्याव्यतिरिक्त ‘लस्ट स्टोरीज’च्या या मानिकेत कियारा आडवाणी, विकी कौशल, मनीषा कोईराला, नेहा धुपिया यांसह वेगवेगळ्या कलाकारांचा समावेश होता. हा सिनेमा सन 2018मध्ये रिलीज झाला होता. भूमीच्या या सिनेमातील अभिनयावर समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. भूमी शेवटची ‘गोविंदा नाम मेरा’ या सिनेमात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. (actress bhumi pednekar felt nervous about intimate scenes in lust stories)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तुनिषा शर्माच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी
‘वेड’ चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीनी शेअर केली पोस्ट, ‘बोलका रितेश आणि अशोक मामा…’

हे देखील वाचा