Wednesday, December 6, 2023

तुनिषा शर्माच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

टीव्हा अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्माहत्या प्रकणामध्ये सतत काहीतरी नवीन खुलासे होताना पाहिले आहे मात्र, हे प्रकरण आता नवीन वळन घेण्याच्या दिशेत आहे. तुनिषाने (दि, 24 डिसेंबर) रोजी शुटिंगच्या सेटवर तिचा को-स्टार म्हणजेच शीजान खान याच्या खोलीत गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील सेलिब्रिटींप्रमाने राजकीय नेतेही भावना व्यक्त करत आहेत. नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तुनिषाच्या कुटुंबियाची भेट घेतली आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा(Tunisha Sharma) हिच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड शीजान खान (Sheezan Khan) याला 4 दिवसांसाठी पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतले आहे. त्याची कडकरित्या चौकशी सुरु केली आहे. मात्र, या प्रकरणाने वेगळेच वळन घेतलेले दिसून येत आहे. राजकारणी आणि केंद्रीय मंत्री रमदास आठवले यांनी तुनिषाची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) यांना आश्वासन दिले आहे की, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल. (Union Minister Ramdas Athawale has met Tunisha’s family and has assured Vanita Sharma that the accused will be punished severely.)

रामदास आठवले यांनी तुनिषाच्या आईला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले की, “टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईची भेट घेतली. शीजान खानला कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांची भेट घेणार आहे. तुनिषाचा विश्वासघात केलेल्या शीजानला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी दिली गेली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून 25 लाखांची मदत करावी तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे तीन लाख रुपयांची सांत्वनपर मदत केली जाईल”, असं रामदास आठवेलेंनी सांगितलं आहे.

तुनिषाच्या आत्माहत्येला 5 दिवस उलटले आहेत त्याशिवाय रोज काहीतरी नवीन खुलासे होत असातात. (दि,24 डिसेंबर) रोजी तिने हे टोकाचं पाउल उचलून तिचं आयुष्य संपवलं. (दि, 27 डिसेंबर) रोजी तिच्या देहााचे अंतिम संस्कार करण्या आले. ‘अलीबाबा दास्तान ए काबुल’ (Ali Baba: Dastaan-E-Kabul) या मालिकेच्या सेटवरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते मात्र, यांच ब्रेकअप झाल्यानंतर नैराश्य आल्याने तुनिषाने आत्महत्येतचं पाऊल उचलल्याचा आरोप  तुनिषाच्या आईने केला आहे. शीजानवर आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्यााला 4 दिवसांसाठी कोठडी मागण्यात आली होती मात्र, आता त्यानध्ये वाढ केली करुन 30 डिसेंबर पर्यंत शीजानला पोलिस कोठडी होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘वेड’ चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीनी शेअर केली पोस्ट, ‘बोलका रितेश आणि अशोक मामा…’
खळबळजनक! झारखंडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर गोळ्या झाडून केली हत्या

हे देखील वाचा