Saturday, July 6, 2024

जरा इकडे पाहा! भूमी पेडणेकरने फ्लॉन्ट केला आपल्या पाठीवरील तीळ; लेहंगा- चोलीतील लूकने चाहत्यांना भुरळ

सन २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट तर सर्वांना लक्षात असेलच. का नाही असणार, त्या चित्रपटातील अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. ती अभिनेत्री म्हणजेच भूमी पेडणेकर होय. भूमीने याच चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर तिने स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि आज तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान बनवले आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तसेच, आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिच्या एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

बॅकलेस लेहंगा- चोलीमध्ये दाखवल्या आपल्या अदा
भूमी येत्या काही दिवसात एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यांमध्ये ‘बधाई हो’ आणि ‘रक्षाबंधन’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. असे असले, तरीही यापूर्वी अभिनेत्री आपल्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच अभिनेत्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक अवतारात दिसत आहे. भूमीने दिवाळीच्या खास क्षणी आपली आवडती लेहंगा- चोली परिधान केली, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. (Actress Bhumi Pednekar Flaunt Her Back Til Actress Was Seen In Deep Neck Lehenga Traditional Look)

अशाप्रकारे आपला लूक केला पूर्ण
फोटोंमध्ये भूमीने गुलाबी रंगाचा लेहंगा- चोली घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंद्वारे त्याने सिक्रेट तीळही दाखवले आहे. अधिक सुंदर दिसण्यासाठी भूमीने न्यूड मेकअपसह केसांची पोनी बनवली आहे. दागिन्यांच्या नावावर अभिनेत्रीने फक्त हार घातला आहे.

पाठीवरील तीळ केला फ्लॉन्ट
भूमीने एका फोटोमध्ये तिच्या पाठीवरील तीळही फ्लॉन्ट केला आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दिल और तिल.” अभिनेत्रीने एकत्र अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या आकर्षक पोझ देताना दिसत आहे. लाखो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत. चाहते सतत कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. भूमीच्या अदांनी चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केले आहे.

चाहत्यांशी सतत संवाद साधत असते भूमी
अभिनयासोबतच भूमी पेडणेकर तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी परिचित करते. चाहतेही तिच्या ताज्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-कपूर बहिणी झाल्या ट्रोल! जान्हवी अन् खुशीने दिलेली पोझ पाहून, नेटकरी विचारतायेत ‘असे’ प्रश्न

हे देखील वाचा