अभिनेत्री बिपाशा बासू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 1996 मध्ये त्यांनी पहिल्यांदा गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेलचा किताब जिंकला. बिपाशा शनिवारी (7 जानेवारी) तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिवशी तिच्या आयुष्यातील रंजक किस्से जाणून घेऊया.
अक्षय खन्नासोबत बॉलिवूडमध्ये करणार होती पदार्पण
बिपाशाचा (Bipasha Basu) जन्म 7 जानेवारी, 1979 रोजी नवी दिल्लीत येथे झाला होता. कोलकाता येथे वाढलेल्या बिपाशाने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा विनोद खन्ना त्यांचा मुलगा अक्षय खन्ना याच्या ‘हिमालय पुत्र’ या पदार्पण चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्यावेळी बिपाशाला या चित्रपटाची ऑफरही आली होती, पण त्यावेळी ती खूपच लहान होती, त्यामुळे तिला हा चित्रपट करता आला नाही. यानंतर दिग्दर्शक जेपी दत्ता अभिषेक बच्चनसोबत ‘आखरी मुघल’ चित्रपटाची योजना करत होते. या चित्रपटासाठी बिपाशाचे नाव फायनल करण्यात आले होते, पण हा चित्रपट होऊ शकला नाही. नंतर जेपी दत्ताने तिला अभिषेक बच्चनचा पदार्पण चित्रपट ‘रिफ्युजी’मध्ये सुनील शेट्टीसोबत कास्ट करण्याचा विचार केला. परंतु बिपाशाने ही भूमिका करण्यास नकार दिला. अखेरीस, 2001 मध्ये बिपाशाने अक्षय कुमार आणि बॉबी देओल अभिनित चित्रपट ‘अजनबी’मधून पदार्पण केले.
बिपाशाच्या अफेअर्सचे किस्से
बिपाशा अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असते. बिपाशाचे तिच्या को-स्टारसोबत अफेअर होते. 2002 मध्ये बिपाशा आणि डिनो मोरियाचे (Dino Morea) चार वर्षांनी ब्रेकअप झाले. यानंतर बिपाशाने जॉन अब्राहमला (John Abraham) डेट करायला सुरुवात केली. दोघांचे प्रेमप्रकरण अनेकदा चर्चेत होते. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. बिपाशा आणि जॉन 2011 मध्ये वेगळे झाले. यानंतर बिपाशाचे नाव हरमन बावेजासोबत जोडले गेले. बिपाशा आणि हरमनची प्रेमकहाणीही फार काळ टिकली नाही. ते 2014 च्या सुरुवातीला सुरू झाली आणि अखेरीस संपली.
‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर बिपाशा-करणची झाली होती भेट
बिपाशाच्या आयुष्यात 2015 मध्ये पुन्हा प्रेमाने दार ठोठावले. बिपाशाच्या आयुष्यात अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आला. दोघांची भेट ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. इथून दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. या दोघांच्या अफेअरचीही चर्चा रंगली होती. त्याचवेळी करणने बिपाशाला लग्नासाठी प्रपोजही केले होते. दोघांनी 30 एप्रिल, 2016 रोजी लग्न केले.
कास्टिंग काऊचचा केला आहे सामना
बिपाशाने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तिलाही एकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. बिपाशा म्हणाली की, “एका मोठ्या निर्मात्याने मला मेसेज केला की, तो माझ्या स्माईलला खूप मिस करत आहे. सुरुवातीला मी याकडे लक्ष दिले नाही. पण नंतर मला थोडेसे अस्ताव्यस्त वाटले.” बिपाशा पुढे म्हणाली की, ”जेव्हा निर्मात्याने मला पुन्हा मेसेज केला तेव्हा मला समजले की, काहीतरी गडबड आहे. मी माझ्या जवळच्या मित्राला मेसेज पाठवला आणि त्याने अपशब्द वापरले. यानंतर मी तोच मेसेज त्या निर्मात्यालाही पाठवला.” बिपाशाने सांगितले की, तिने चित्रपटासाठी जे पैसे घेतले होते, ते तिला निर्मात्याकडे परत करायचे होते, पण निर्मात्याने पैसे घेण्यास नकार दिला. त्यानंतर बिपाशाने त्या निर्मात्यासोबत कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.
बिपाशाने इंडस्ट्रीत एकामागून एक अनेक हिट चित्रपट केले आहेत. बिपाशाने 2001 च्या थ्रिलर ‘अजनबी’मध्ये तिच्या नकारात्मक भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि लाखो चाहत्यांची ती आवडती अभिनेत्री बनली. हा चित्रपट इतका हिट झाला की, तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सध्या बिपाशा करण सिंग ग्रोवरसोबत तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद लूटत आहे.(actress bipasha basu birthday special plan to debutant with akshay khanna and dating with many stars)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री बिपाशाचा प्रेग्नंसीबद्दल हैराण करणारा खुलासा; म्हणाली, ‘मी पूर्ण दिवस टॉयलेटमध्ये…’
जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न