Sunday, April 26, 2026
Home बॉलीवूड अभिनेत्री बिपाशाचा प्रेग्नंसीबद्दल हैराण करणारा खुलासा; म्हणाली, ‘मी पूर्ण दिवस टॉयलेटमध्ये…’

अभिनेत्री बिपाशाचा प्रेग्नंसीबद्दल हैराण करणारा खुलासा; म्हणाली, ‘मी पूर्ण दिवस टॉयलेटमध्ये…’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सध्या अभिनेत्री आई झाल्याचा आनंद लुटत आहे. बिपासा सातत्याने बेबी सोबत फोटो आणि व्हिडिओही शेअर करत आहे. विशेष म्हणजे, बिपाशा 43 व्या वयात आई बनली आहे. अशात तिच्यासाठी प्रेग्नंसीचा प्रवास फार अवघड हाेता. याचा खुलासा स्वत: अभिनेत्री बिपाशाने केला आहे.

पहिले तीन महिने आव्हानात्मक
माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) हिने सांगितले की, प्रेग्नंसीची पहिली तिमाही म्हणजेच सुरुवातीचे तीन महिने खूप कठीण होते. ती पूर्ण दिवस आजारी असायची. ती म्हणाली की, “एकतर मी बेडवर असायचे किंवा मग टॉयलेटमध्ये. मला खातानाही खूप त्रास व्हायचा. माझे वजनही खूप कमी होऊ लागले होते. माझ्यासाठी फार काही बदल झाले नव्हते, पण हे खूप आव्हानात्मक होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाचा बेबी शॉवर आणि ओटी भरण कार्यक्रम
नुकताच अभिनेत्री बिपाशा बासूचा बेबी शॉवर आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला होता. बेबी शॉवरमध्ये बिपाशाने साध्या गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे, तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हा निळ्या रंगाच्या सूट पँटमध्ये दिसला होता. बिपाशा आणि करण यांच्या या कार्यक्रमामध्ये जेमतेम 20 पाहुणे सहभागी झाले होते. हे सर्वजण या जोडप्याचे जवळचे मित्रमंडळी होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

ओटी भरण कार्यक्रमात सुंदर दिसत होती बिपाशा बासू
बेबी शॉवरपूर्वी अभिनेत्री बिपाशाच्या आईने बंगाली रीतिरिवाजाने तिचा ओटी भरण्याच्या विधी केल्या होत्या. बिपाशाने आपल्या ओटी भरण कार्यक्रमातील अनेक फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या बनारसी साडीत दिसली होती. या पारंपारिक लूकमध्ये बिपाशा भलतीच सुंदर दिसत होती.

बिपाशाचे सिनेमे
बिपाशा ही मागील बऱ्याच वर्षांपासून सिनेमांपासून दूर आहे. ती शेवटची ‘डेंजरस’ या टीव्ही सीरिजमध्ये दिसली होती. ही सीरिज 2020मध्ये प्रदर्शित झाली होती.(actress bipasha basu made a shocking disclosure about her pregnancy said sick all day)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्ट्रेंजर थिंग्स’ फेम बायर्स खऱ्या आयुष्यात आहे तृतीपंथी, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

उर्फी बिकिनी घालून तुरुंगात जाण्यासाठी सज्ज! बेड्या घातलेला व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा