अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती तसेच अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ते दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. खरं तर बिपाशा आणि करण हे कोरोनापूर्वीच आई-वडील बनण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना हा प्रयत्न थांबवावा लागला. अभिनेत्रीने नुकतीच तिच्या प्रेग्नंसीबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. तिने खुलासा केला की, सन २०२१मध्येच त्यांनी पुन्हा पालक बनण्याची योजना आखली होती.
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) हिने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “प्रेग्नंसीवर लक्ष देण्याची योजना होती. मी खरोखर कोणतेही काम करत नव्हते. कारण, मला एका मुलाची आई व्हायचे होते. मला थोडा वेळ लागला. २०२०मध्ये, आम्ही ही कल्पना पूर्णपणे सोडून दिली. कारण, जग कुठे चालले आहे हे आम्हाला माहित नव्हते, म्हणून आम्ही एक वर्षासाठी विश्रांती घेतली. आम्ही २०२१ मध्ये पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि देवाने आमचे ऐकले.”
बिपाशा बासू प्रेग्नंसीबद्दल जाणून झाली भावूक
अभिनेत्रीने तिच्या डिलीव्हरीची तारीख सांगितली नाही. ती प्रेग्नंसीच्या पाचव्या महिन्यात असल्याचे समजले. बिपाशाने त्या क्षणांची आठवण काढली, जेव्हा तिला प्रेग्नंसीबद्दल समजले. तिने सांगितले की, “हा एक खूपच भावूक दिवस होता. मला आठवते की, मी आणि करण आईच्या घरी धावलो. ती पहिली व्यक्ती होती, जिला मला सांगायचे होते.”
View this post on Instagram
बिपाशाला आई बनताना पाहणे ‘या’ व्यक्तीचे स्वप्न
तिने पुढे सांगितले की, “प्रत्येकजण भावूक झाला होता. मला आणि करणला मूल व्हावे, हे माझ्या आईचे स्वप्न होते. मला नेहमीच विश्वास होता की, हे होईल. त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.”
बिपाशा सांगते की, हे जे काही घडत आहे, ते तितकं सोप्पं नाहीये. परंतु तिने आणि करणने आयुष्य बदलणारा निर्णय घेऊन पुढे जाण्यासाठी योग्य वेळ ठरवली. त्यांनी लग्नही उशिरा केले होते. ते दोघेही ‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवर भेटले होते. त्यांच्यात या सिनेमाच्या सेटवर जवळीक वाढली आणि पुढे ते एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर बिपाशा आणि करणने सन २०१६मध्ये लग्न केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे रंगल्या चर्चा, ‘या’ गोष्टीसाठी मिळवला हात
‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीला पहिल्या भेटीतच बॉयफ्रेंडने केलेली घाणेरडी मागणी, तिनेही…
दहा वर्षात अफाट यश मिळवूनही सनी लिओनी हळहळली; म्हणाली, ‘आजपण अनेकजणांना माझ्यासोबत…’