Sunday, April 14, 2024

‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीला पहिल्या भेटीतच बॉयफ्रेंडने केलेली घाणेरडी मागणी, तिनेही…

तब्बल १० पेक्षा अधिक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या टीव्ही शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या शोचा समावेश होतो. या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करते. यामधील अशीच एक अभिनेत्री आहे, जी या शोचा भाग राहिली होती आणि तिच्या पात्राला चाहत्यांची पसंतीही मिळाली. ती अभिनेत्री म्हणजे आराधना शर्मा होय. आराधना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातही खूपच बोल्ड आहे. तिने तिच्या आयुष्याशी निगडीत एक धक्कादायक गोष्ट मुलाखतीदरम्यान सांगितली होती. कोणती होती ती गोष्ट चला तर जाणून घेऊया…

पहिल्याच भेटीत केली होती सेक्सची मागणी
अभिनेत्री आराधना शर्मा (Aradhana Sharma) ही तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती दरदिवशी तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधत असते. माध्यमांतील वृत्तांनुसार, एका मुलाखतीदरम्यान आराधनाने सांगितले होते की, ती जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती, तेव्हा त्याने आराधनाला थेट सेक्सची मागणी केली होती.

अभिनेत्रीने दिलेला नकार
तिने सांगितले होते की, पहिल्याच भेटीत ती सेक्स करण्यासाठी अस्वस्थ होती. मात्र, तो मुलगा अभिनेत्रीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हट्ट करत होता. त्याने किस करण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिला होता. तिने म्हटले होते की, “नाही म्हणजे नाही.”

सेक्स केल्यानंतर झाली होती गडबड
यापूर्वी एका मुलाखतीत आराधनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणखी एक धक्कादायक वक्तव्य करून सर्वांनाच धक्का दिला होता. तिने सांगितले होते की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत जवळपास दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. यादरम्यान त्यांच्यात सेक्स झाला, ज्यामध्ये तिला काहीही समस्या नव्हती. मात्र, एकदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आराधनाला शंका आली. तिला वाटले की, काहीतरी चुकतंय. तिने ती घटना दुर्लक्षित करत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला जाणवले की काहीतरी गडबड आहे. इतका थकवा का जाणवत आहे. वेळ न घालवता आराधना औषधांच्या दुकानात गेली. तिने तिथून प्रेग्नंसीची चाचणी करणारी वस्तू खरेदी केली आणि घरी येऊन तपासणी केली. त्यानंतर तिची चाचणी निगेटिव्ह असल्याचे समजले. तेव्हा कुठे तिने सुटकेचा नि:श्वास सोडला.

आराधना हिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यात ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’, ‘अलादिन- नाम तो सुना होगा’, ‘हिरो गायब मोड ऑन’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दहा वर्षात अफाट यश मिळवूनही सनी लिओनी हळहळली; म्हणाली, ‘आजपण अनेकजणांना माझ्यासोबत…’
कॅनेडियन निर्मात्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ म्हणजे ‘कचरा’, म्हणाला, ‘ऑस्करला गेल्यास भारतासाठी…’
एक्स गर्लफ्रेंड आलियाची ‘ही’ गोष्ट आजही मिस करतो सिद्धार्थ; ऐकून रणबीरचाही चढेल पारा

हे देखील वाचा