Saturday, June 29, 2024

बोल्ड फोटो टाकण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने केलं वडिलांना ब्लॉक, त्यांना समजताच…

यावेळी ‘खतरों के खिलाडी १२’ या रियॅलिटी शोमध्ये स्टंटसह ग्लॅमरची छटा पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कनिका मानही (Kanika Mann) दिसणार आहे. अलीकडेच, टीव्हीची गुड्डन म्हणजेच, कनिका मानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती बिकिनी परिधान केलेली दिसत होती. आता या फोटोबाबत एक अतिशय मजेशीर गोष्ट समोर आली आहे, जी जाणून तुम्हीही चकित व्हाल.

वडिलांना केलं होतं ब्लॉक
हा फोटो अपलोड करण्यापूर्वी अभिनेत्रीने तिच्या वडिलांना ब्लॉक केले होते. वडिलांना हे फोटो दिसू नयेत, म्हणून तिने हे केले. याचा खुलासा स्वतः कनिकाने केला आहे. एका न्यूज वेबसाईटशी बोलताना ती म्हणाली, “बिकिनीमध्ये फोटो अपलोड करण्यापूर्वी मी माझ्या वडिलांना ब्लॉक केले होते. मात्र मी माझ्या बहिणीला ब्लॉक केले नव्हते. म्हणूनच ती माझे फोटो बघत होती. यावर वडिलांनी विचारलेही की, त्यांना माझे फोटो का दिसत नाहीत?

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, बहिणीने वडिलांना समजावून सांगितले की, ती फोटो टाकत नाही, त्यामुळे तुम्ही पाहू शकत नाही. अभिनेत्री पुढे सांगते की, यानंतर तिने लगेच फोटो हाइ़ड केले आणि त्यांना अनब्लॉक केले. अभिनेत्री म्हणाली की, शो प्रसारित झाल्यावर तिला गायब व्हावे लागेल. कारण ती तिच्या वडिलांचा सामना कसा करेल, हे माहित नाही.

नुकतेच कनिका मान या शोच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली होती. असे असूनही कनिका शोमध्ये चांगली कामगिरी करत आहे. या संभाषणात तिने हे देखील सांगितले आहे की, आतापर्यंत एकाही स्पर्धकाने या शोमध्ये स्टंट अबॉर्ट केलेला नाही. हा शो १२ जुलैपासून प्रसारित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा