Thursday, April 25, 2024

राडाच ना! सपना चौधरीच्या गाण्यात डान्ससोबतच भूतांचाही तडका, पुरती घाबरली ‘डान्सिंग क्वीन’

‘हरियाणवी डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी सपना चौधरी नेहमीच आपल्या नवनवीन गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सुरुवातीला आपल्या भागापुरती मर्यादित असलेली सपना थोड्याच काळात प्रतिभेच्या जोरावर आख्ख्या भारतभर प्रसिद्ध झाली. तिला भारताच्या कानाकोपऱ्यातून कार्यक्रमांसाठी बोलावणे येऊ लागले. आता सपनाला ओळखत नाही, असा क्वचितच व्यक्ती सापडेल. अशातच सपनाचे एक गाणे चांगलेच हिट होत आहे. तिचे हे नवीन गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

सपना चौधरी (Sapna Chaudhary) हिच्या नवीन गाण्याचे नाव ‘चाक्की नीचे भूत पिया’ (Chakki Niche Bhoot) असे आहे. या गाण्यात सपना आपल्या डान्स मूव्हजने चाहत्यांनाही थिरकायला लावत आहे. मात्र, नेहमी निर्भीड असणारी सपना या गाण्यात मात्र घाबरताना दिसत आहे.

सपनाने केला भूतांसोबत डान्स
या गाण्यात सपनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात ती भूतांना घाबरताना दिसत आहे. तिला पाहून असे दिसते की, तिची पळता भुई थोडी झाली आहे. तिच्या या गाण्यात फक्त डान्सनेच नाही, तर भूतांचाही तडका लावला आहे. या गाण्यात सपना भूतांना घाबरताना, तर कधी त्यांच्यासोबत गाणी गात मजा-मस्ती करतानाही दिसत आहे. सपनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा टिझर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) 

सपनाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या टिझरला एका दिवसात ९२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १२ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

याव्यतिरिक्त हे गाणे सोमवारी (दि. २० जून) सोनोटेक म्युझिक या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला एका दिवसातच ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, व्हिडिओवर ६ हजारांहून अधिक कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

हे गाणे ५२ गज का दामन फेम गायिका रेणुका पंवारने गायले आहे. या गाण्याला अमन जाजी यांनी संगीत दिले आहे. दुसरीकडे, राकेश माजरेया यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा