आगळ्यावेगळ्या फॅशन स्टाईलमुळे माध्यमांचे लक्ष वेधणारी उर्फी जावेद सध्या भलतीच चर्चेत आहे. उर्फी आणि लेखक चेतन भगत यांच्यातील वादाने नवे वळण घेतले आहे. या वादावर टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना उर्फी जावेदवर भडकली. तिने चेतन भगत यांच्या वक्तव्याचे समर्थन करत उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सवर निशाणा साधला होता. यानंतर उर्फीने चाहतवर पलटवार करत प्रतिक्रिया दिली होती. अशात आता चाहतनेही उर्फीवर आपला राग व्यक्त केला आहे.
चाहत खन्नाचे उर्फीबद्दल वक्तव्य
मागील काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चाहत खन्ना (Chahatt Khanna) यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. अशात चेतन भगत (Chetan Bhagat) यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर चाहतने उर्फीशी पंगा घेतला आहे. यानंतर आता हा वाद चेतन भगत आणि उर्फी जावेद नाही, तर चाहत खन्ना आणि उर्फी जावेद असा बनला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत चाहतने उर्फीवर हल्लाबोल केला आहे.
View this post on Instagram
काय म्हणाली चाहत खन्ना?
चाहतने म्हटले की, “चिखलात दगड मारला, तर चिखल आपल्यावरच येईल. माझ्यासोबतही मागील काही दिवसांत असेच झाले होते. मात्र, मी बाजूला सरकले. सध्या मी या गोष्टीमुळे खुश आहे की, माझ्याप्रमाणे इतरांनीही तिच्याविरुद्ध बोलणे सुरू केले आहे.” चाहतने यापूर्वी म्हटले होते की, “मला वाटत नाही की, चेतन यांनी उर्फीबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे.”
View this post on Instagram
उर्फीने चाहत खन्नावर साधला निशाणा
मंगळवारी (दि. 29 नोव्हेंबर) चाहत खन्ना हिच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद हिनेही सोशल मीडियावर हल्लाबोल करत अभिनेत्रीचा समाचार घेतला होता. ती म्हणाली की, “माझ्या नावाचा वापर करत प्रसिद्धी मिळवणे बंद कर. कधीपर्यंत तू अशाप्रकारे माझ्या नावाच्या सावलीखाली चर्चेत येण्याची संधी शोधते. तसेच, चेतन भगतचे समर्थन करत तू एका चुकीच्या विचारधारेला पाठिंबा दिला आहे.”
View this post on Instagram
खरं तर, उर्फीने सुकेश चंद्रशेखर वादात सामील असलेल्या चाहत खन्नाच्या नावावरूनही वक्तव्य केले. तसेच, आपल्या लेटेस्ट पोस्टच्या कॅप्शनमधून चाहत आणि चेतन भगत, यांच्यावर टीका केली. (actress chahatt khanna spoke about urfi javed in controversy with chetan bhagat)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
असं काय झालं की, ‘बिग बॉस 14’ विनर रुबीनाला द्यावे लागले प्रेग्नंसीवर स्पष्टीकरण; घ्या जाणून
अर्रर्र! अरबाज खानने 22 वर्ष लहान प्रेयसीसाेबत केले ब्रेकअप?