Friday, May 24, 2024

उर्फी जावेद झाली टॉपलेस, शक्कल लढवत मोबाईल-चार्जरपासून बनवली बिकिनी

बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारली उर्फी ‘मेरी दुर्गा‘, ‘चंद्र नंदनी‘ यांसारख्या दमदार मालिकेत दिसली. उर्फी  तिच्या लूकमुळे चर्चेत असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती दररोज इंस्टाग्रामवर तिच्या क्रिएटिव्ह लूकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद एक स्टाइल आयकॉन आहे. अगदी बॉलिवूडचा स्टाइल आयकॉन रणवीर सिंगही उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सचा चाहता आहे. अलीकडे उर्फी जावेदने तिचा नवा लूक शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. उर्फीने तिच्या नवीन लूकमध्ये क्रिएटिव असण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

उर्फी जावेद (urfi javed) हिचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या नव्या लूकमध्ये उर्फीने ते काम केले आहे, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. उर्फी जावेदने तिच्या लेटेस्ट लूकमध्ये मोबाईल फोनला टाॅप बनवले आहे. तिचा हा लूक पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

यूएसबी वायरने दोन मोबाइल फोन जोडून उर्फीने आपला टॉप बनवला आहे आणि निळ्या रंगाचा कोट आणि पँट घातला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फुल चार्ज्ड’. काही वेळापुर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आले आहेत. उर्फीच्या लेटेस्ट लूकवर तिचे चाहते भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

अलीकडेच सोशल मीडियावर उर्फी एथनिक लूकमध्ये दिसली हाेती. या लूकमध्ये उर्फीने बेबी पिंक रंगाचा ड्रेस परीधान केला हाेता. उर्फी तिच्या लूकसह नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी ओळखली जाते. बड्या फॅशन डिझायनर्सनीही उर्फीच्या लूकचे कौतुक केले आहे. (actress urfi javed takes the internet by storm by sharing her new look)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हही वाचा-
अपारशक्तीने मध्यरात्री केले होते आकृतीला प्रपोज, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी

पाच वर्षाच्या रिलेशननंतर विघ्नेश आणि नयनताराने थाटला संसार, ‘अशी’ आहे त्यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा