Wednesday, July 2, 2025
Home हॉलीवूड दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. या बातमीने प्रत्येकाच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही. दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या चार्लबी डीन हिचे सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) निधन झाले आहे. ती न्यूयॉर्क सिटीच्या एका रुग्णालयात दाखल होती. तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, ती अवघ्या 32 वर्षांची होती. तिचे एवढ्या कमी वयात निधन झाल्याने प्रत्येकाला झटका बसला आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

वयाच्या 14व्या वयापासून कामाला सुरुवात
अभिनेत्री चार्लबी डीन (Actress Charlbi Dean) हिने वयाच्या 14व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली होती. ती शालेय दिवसात एवढी सडपातळ होती की, तिला टुथपिक (दात टोकरायची काडी) म्हटले जायचे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘वोग’ कव्हरपासून ते ‘गुच्ची’ कव्हरपर्यंत तिने अनेक फोटोशूट केले होते. युनायटेड कलर्स ऑफ बेनेटनव्यतिरिक्त ती राल्फ लॉरेनच्या शूटिंगमध्येही दिसली होती.

सन 2008मध्ये अपघात
सन 2008मध्ये चार्लबी डीन हिचा कार अपघात झाला होता. तिचे नशीब चांगले होते की, तिचा जीव वाचला. मात्र, यादरम्यान ती गंभीर जखमी झाली होती. त्यात तिच्या चार बरगड्या, मनगट आणि कोपर मोडले होते. याव्यतिरिक्त तिच्या डाव्या फुफ्फुसालाही दुखापत बिघाड झाला होता. त्यावेळी ती फक्त 18 वर्षांची होती.

सन 2010मध्ये अभिनयात पदार्पण
सन 2010मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षांच्या वयात चार्लबी डीन हिने तिच्या पहिल्या सिनेमात काम केले होते. तिच्या सिनेमाचे नाव ‘स्पड’ असे होते. याव्यतिरिक्त ‘स्पड 2’ या सिनेमातही अभिनेत्रीने चांगले काम केले होते. याव्यतिरिक्त ती 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक लायटनिंग’ या सीरिजमध्येही झळकली होती. ‘ट्रायएँगल ऑफ सॅडनेस’ हा चार्लबीच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा सिनेमा आहे. तिच्या या सिनेमाला यावर्षी कान चित्रपट महोत्सवात ‘पाल्म डोर’ने सन्मानित करण्यात आले होते. तिचा सिनेमा यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नानंतर दोन वर्षातच कोर्टात पोहोचली लवस्टोरी, लोकप्रिय अभिनेत्रीची पतीविरोधात तक्रार दाखल
केजीएफच्या निर्मात्यांची तर कधी प्रेक्षकांची, ३ वेळा आमिर खानने मागितली आहे माफी
व्हायरल फोटोमुळे शेफाली वैद्य यांची सई ताम्हणकरवर जोरदार टिका; म्हणाल्या, ‘कोणती हिंदू स्त्री…’

हे देखील वाचा