Thursday, March 30, 2023

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ठार वेडा झालेला चाहता, आख्खी जमीनच करून बसला होता नावावर

अल्ताफ राजा यांच्या ‘तुम तो ठहरे परदेसी’ या अल्बममधून अभिनेत्री चित्रांगदा सिंग पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या नजरेत आली. पुढे तिने ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. फिल्मी कारकीर्द असूनही चित्रांगदाला अभिनयात अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीत हात आजमावला. चित्रांगदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट फोटो शेअर करत असते. अशातच तिने माध्यमांशी संवाद साधताना अनेक गाेष्टींचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान चित्रांगदा सिंगं (Chitrangda Singh) हिने सांगितले की, “प्रत्येक अभिनेत्याला असं वाटतं की, तो शेवटपर्यंत त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकला नाही. मला सुद्धा असे वाटते. मला नाही वाटत की, मी पूर्णपणे काम केले आहे. मी जितके चित्रपट केले आहे. ते मला सांगण्यास असमर्थ आहे की, मी काय करण्यास सक्षम आहे. मला एक अभिनेत्री म्हणून माझे सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घ्यायला आवडेल. मला अजूनही अभिनेत्रीच्या रुपात खूप काही शिकायचं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitrangda Singh (@chitrangda)

चाहत्याने कायदेशीररीत्या चित्रांगदाच्या नावावर केली जमीन
मुलाखीत दरम्यान चित्रांगदाला विचारण्यात आले की, “तुझा साेशल मीडियावर इतका माेठा चाहतावर्ग आहे, तर त्यातील तुझा काेणत्या क्रेजी चाहत्‍यासाेबत सामना झाला आहे का?” चित्रांगदाने यावर सांगितले, “मी अनेक चाहत्यांना भेटली नाही,  पण एक चाहता हाेता जाे फार वेडा हाेता. त्याने कायदेशीररीत्या त्याची जमीन माझ्या नावाने करून कागदपत्रे पाठवले हाेते. त्याला माझा पत्ता देखील माहिती हाेता. त्यामुळे तो सरळ मुंबईला माझ्या घरी आला हाेता. हे फार भीतीदायक हाेते. मला याविषयी माहिती काढायची हाेती.”

बाॅडी शेमिंगवर चित्रांगदानं दिलं चोख उत्तर
बॉडी शेमिंग थांबवण्यासाठी आणि बॉडी पॉझिटिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. बॉडी शेमिंगचा लोकांवर काय परिणाम होतो आणि ते कसे थांबवता येईल. यावरही अभिनेत्री मोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, “मी अजिबात बॉडी शेमिंगच्या बाजूने नाही. मला झिरो फिगर आणि हे सगळं अजिबात आवडत नाही. तंदुरुस्त राहणे, व्यायाम करणे, कोणताही खेळ खेळणे आणि आपल्या फिटनेस गोल्स विषयी जागरुक असणे फार महत्वाचे आहे.”

हेही वाचा- भांडं फुटलं रे! अनन्या की रश्मिका, कुणाला डेट करतोय विजय देवरकोंडा? करण जोहरने स्पष्टच सांगितलं

ती पुढे म्हणाली, “काेणाच्या शरीराचा आकार हा त्यांच्याकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकाेन नाही. बहुतेक क्रीडा महिलांचे शरीर 8-9 इतके असू शकते, परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वात योग्य आहेत. त्यांच्याकडे अधिक आकर्षक शरीर आहे. याला एका चांगल्या लाईफ स्टाईलच्या रुपात बघण्याची गरज आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitrangda Singh (@chitrangda)

चित्रांगदा हिने ‘हजारों ख्वाईशे ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यांनतर तिने अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत ‘देसी बॉईज’ या सिनेमात काम केले. तसेच, तिने ‘इन्कार’, ‘ये साली जिंदगी’ यांसारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. चित्रांगदा हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बाेलायचे झाले, तर तिने 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधावासोबत लग्न केले हाेते. तिला या नात्यातून एक मुलगाही आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सिनेमासोबतच राजकारणाचं मैदानही गाजवणार कंगना रणौत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
बॉलिवूडवर शोककळा! सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, ‘भाईजान’ही हळहळला

हे देखील वाचा