बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. यासोबतच ती राजकीय विषयांवरही मत मांडत असते. अनेकवेळा तिच्या राजकारणात येण्याच्या चर्चा रंगत असतात. अशात कंगना लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कंगना लवकरच राजकारणामध्ये पाऊल ठेवणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या बातम्यांनी चांगल्याच अफवा रंगल्या आहे. वृत्तांनुसार, 1 ऑक्टाेबरला अभिनेत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर भेटायला जाऊ शकते.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर कंगना रणौत (Kangana Ranaut) हिची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतची ही पहिलीच भेट आहे. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्यासाेबत कंगनाचा वाद झाला हाेता. परिणामी बीएमसीने कंगनाच्या खार येथील कार्यालयावर बुलडोजर चालवला होता. हेच कारण हाेते की, सत्ता बदल्यावर कंगना फार खुश हाेती. इतकेच नाही, तर तिने शिवसेनेवर टीकास्त्र सोडत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले हाेते.
तिने साेशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा फाेटाे शेअर करत लिहिले होते की, “यशाेगाथा किती प्रेरणादायी आहे… पाेटापाण्यासाठी ऑटाेरिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्वाच्या आणि शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनण्यासाठी… अभिनंदन सर.”
Kangana Ranaut congratulates #EknathShinde after he becomes CM of #Maharashtra "एकनाथ शिंदे"#MaharashtraPolitcalCrisis #MasterStroke #KanganaRanaut #KanganaRanaut𓃵 pic.twitter.com/c0bM3sVAvc
— KRInstaupdate (@KR_Insta) June 30, 2022
हेच कारण आहे की, कंगना रणाैत आणि एकनाथ शिंदे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. प्रत्येकाचे लक्ष या भेटीवर आहे. दाेघांमध्ये काय बातचीत हाेणार? काेणत्या मुद्यांवर चर्चा हाेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे शनिवारी भेट झाल्यानंतर कळेल.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर कंगना रणाैत शेवटची ‘धाकड’ या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकला नव्हता. आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री या चित्रपटात अभिनयासाेबत दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, सतीश काैशिक यांसारखे प्रसिद्ध कलाकार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवूडवर शोककळा! सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, ‘भाईजान’ही हळहळला
भांडं फुटलं रे! अनन्या की रश्मिका, कुणाला डेट करतोय विजय देवरकोंडा? करण जोहरने स्पष्टच सांगितलं