टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे शिखर गाठणारी मालिका म्हणजे रामानंद सागर यांचे ‘रामायण.’ या मालिकेने यात काम करणाऱ्या लहान मोठ्या सर्वच कलाकरांना तुफान ओळख मिळवून दिली. या मालिकेत सीतेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दीपिका चिखलीयाला देखील या मालिकेने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत काम केल्यानंतर दीपिका एका रात्रीत सुपरस्टार झाली. दीपिका मनोरंजनविश्वात अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिला ओळख रामायणानेच मिळवून दिली.
रामायणामुळे प्रसिद्ध झालेली दीपिका २०२० मध्ये पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. लॉकडाऊनमध्ये पुन्हा रामायण दाखवले गेले आणि दीपिका चर्चेत आली. रामायणाच्या पुन्हा प्रसारणामुळे दीपिका लाइमलाईट्मधे आली. सोशल मीडियावर देखील दीपिका चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सक्रिय झाली. नुकताच दीपिकाने तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर तिच्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. दीपिकाचे हे रोमँटिक फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल देखील होताना दिसत आहे.
दीपिकाने तिच्या पतीसोबत हेमंत टोपीवालासोबतचे हे रोमॅंटिक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “आम्ही खूप आनंदी आहोत, तुमच्यासोबत असण्यामुळे खूपच आनंदी आणि आभारी आहे. माझ्या हातांना विशाल दगडासारखे मजबुतीप्रमाणे सांभाळण्यासाठी धन्यवाद, ज्यावर मी नेहमी पडू शकते, प्रेम आपल्याला कधीच सोडू शकत नाही. आपल्यासाठी अजून भरपूर बाकी आहे.
दीपिकाच्या या पोस्टवर तिचे फॅन्स भरपूर कमेंट्स करत तिला शुभेच्छा देत आहेत. यासोबतच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव देखील करत आहे. रील लाईफ सीताची ही रियल लाईफ रामाची जोडी सर्वांना खूपच आवडत आहे. दीपिकाने हेमंत टोपीवालासोबत २२ नोव्हेंबर १९९१ साली लग्न केले होते. त्याच्या लग्नाचा हा ३० वा वाढदिवस होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट