Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड जेव्हा दीपिका पदुकोणला वापरावे लागले होते पुरुषांचे घाणेरडे बाथरूम, स्वत:च सांगितली संपूर्ण हकीकत

जेव्हा दीपिका पदुकोणला वापरावे लागले होते पुरुषांचे घाणेरडे बाथरूम, स्वत:च सांगितली संपूर्ण हकीकत

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवते. त्यासह ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडिया दीपिका सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा खुलासा करत असते. नुकताच तिने एक खुलासा केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. दीपिका सध्या तिच्या ‘गहराइयां’च्या संपूर्ण स्टारकास्टसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिच्या एका प्रमोशनदरम्यान झालेल्या संवादात दीपिकाने स्वतःबद्दल एक मजेशीर खुलासा केला आहे.

दीपिकाने सांगितले की, या कॉन्सर्ट दरम्यान एकदा तिला वॉशरूममध्ये जायचे होते. परंतु जेव्हा ती मुलींच्या वॉशरूममध्ये पोहोचली तेव्हा बाहेर खूप मोठी रांग होती. त्यामुळे ती पुरुषांच्या वॉशरूममध्ये गेली होती. दीपिकाने सांगितले की, यावेळी तिच्यासोबत आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील उपस्थित होती.

मुलाखतीदरम्यान दीपिकाला विचारण्यात आले की, ती एखाद्या परिस्थितीत पुरुषांचे वॉशरूम वापरणार का? अभिनेत्रीने यावर उत्तर देण्याआधीच दिग्दर्शक शकुन बत्रा म्हणाले की, “100% दीपिका हे करेल.” त्याचवेळी अनन्या म्हणाली की, “जर वॉशरूम स्वच्छ असेल तर दीपिका हे करू शकते.” तर दीपिका असे अजिबात करणार नाही, असे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने सांगितले.

यानंतर दीपिकाने याबाबत स्वत:च उत्तर देताना खुलासा केला की, ती हे करू शकते, तिने हे केलेही आहे. यादरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने हे केले तेव्हा तिच्यासोबत शकुनही उपस्थित होता. बर्लिनमध्ये एक कोल्डप्ले कॉन्सर्ट चालू होता आणि ते गाण्याचा अजिबात आनंद घेत नव्हतो. त्यावेळी तिच्यासोबत आलिया भट्टही होती.

अभिनेत्रीने सांगितले की, “आलिया आणि मी तिथून बाहेर आलो आणि जेव्हा आम्ही बाथरूममध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसले की, बाथरूमच्या बाहेर लांबच लांब रांग लागली होती. लांबलचक रांग पाहून आम्ही पुरुषांच्या बाथरूमच्या दिशेने धावलो, पण तिथे अजिबात स्वच्छता नव्हती. पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. जर मला बाथरूम वापरण्याची गरज असेल, तर इतर गोष्टींमुळे मला काही फरक पडणार नाही.”(actress deepika padukone when deepika padukone and alia bhatt had to use dirty mens washroom the actress revealed about the incident)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणला वयाच्या १८व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांटचा दिला होता सल्ला, अभिनेत्रीने म्हणाली ‘सर्वात वाईट…’

एकदा नाही तर हजारवेळा दीपिका पदुकोणने बोललेत चुकीचे डायलॉग, मस्तीचा व्हिडिओ आला समोर

हे देखील वाचा