Wednesday, March 22, 2023

‘गहराइया’ चित्रपटातील ‘डूबे’ गाणे रिलीझ, गाण्यात दिसली दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीची बोल्ड केमिस्ट्री

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अभिनेत्री अनन्या पांडे अभिनित चित्रपट ‘गहराइया’चे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. चित्रपटातील ‘डूबे’ या गाण्यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची बोल्ड केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले दिसत होते. चित्रपटाच्या टीझरमध्ये झळकलेल्या या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकनंतर आता या चित्रपटातील नवीन गाणे ‘डूबे’ प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

गाण्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धांत (Siddhant ChaturvedI) आणि दीपिका बरोबर (Deepika Padukone) यांच्यातील रोमँटिक आणि किसिंग सीन दाखवण्यात आले आहेत. या गाण्यात दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम दिसत आहे. हे गाणे अंकुर तिवारी यांनी बनवले आहे, तर कबीर कठपलिया आणि सवेरा यांनी संगीत दिले आहे. हे गाणे कौसर मुनीर यांनी लिहिले असून, लोथिका झा यांनी गायले आहे.

चित्रपटाच्या पहिल्या गाण्याबद्दल सविस्तर माहिती देताना अंकुर तिवारी म्हणाले की, “कबीर, सवेरा आणि आमचे गीतकार कौसर या सर्वांनी तरुणाईचा प्रवेश लक्षात घेऊन एक अभूतपूर्व काम केले आहे. त्याचबरोबर लोथिकाच्या गायनाने गाण्याला योग्य ताजेपणा दिला आहे.”

संगीतकार कबीर कठपलिया म्हणाले की, “चित्रपट आणि त्याचे संगीत यावर काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. टीझरनंतर आम्हाला मिळणारे प्रेम खूप खास आहे. ‘गहराइया’ हा आपल्या सर्वांसाठी खरोखरच एक खास अल्बम आहे आणि आम्हाला आशा आहे की, प्रेक्षकांना तो ऐकण्यात जितका आनंद वाटतो तितकाच आम्हाला तो बनवताना आवडला आहे.”

दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या चित्रपटात अनन्या पांडे आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर जगभरातील २४० हून अधिक देशांत आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा