Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

Video: छोट्या पडद्यावरील संस्कारी ‘सून’ करत होती डान्स, पण हवेने गेला घोळ अन् झाली Oops Momentची शिकार

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्री आता सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. त्या आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असतात. काहीवेळा त्यांच्याकडून असं काही घडतं की, त्या ऊप्स मोमेंटची शिकार होऊन बसतात. असंच काहीसं आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका सिंगसोबत घडलं आहे. दीपिकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर दीपिका सिंगचा (Deepika Singh) हा व्हिडिओ मागील वर्षीचा आहे. या व्हिडिओत ती सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमातील प्रसिद्ध गाणं ‘बन के तितली दिल उडा’वर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या व्हिडिओत दीपिका ऊप्स मोमेंटची (Oops Moment) शिकार झाली होती. डान्स करताना तिने खूपच छोटा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे हवेमुळे तो ड्रेस सतत उडत होता. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओत दीपिकाने पिवळ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने पायात पांढरे बूटही घातले आहेत. दीपिका डान्स करताना चांगलीच उत्साही दिसत होती.

मात्र, उत्साहात ती आपला उडणारा ड्रेस सांभाळणेच विसरली होती. दीपिकाच्या चाहत्यांना मात्र तिचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. त्यामुळे मागील वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

दीपिकाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओला १ लाख ८० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर २ हजार चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दीपिकाबद्दल थोडंसं
दीपिकाचा जन्म एका राजपूत कुटुंबात २६ जुलै, १९८९ रोजी दिल्लीत झाला होता. ती ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेत तिने ‘संध्या बींदणी’ हे पात्र साकारले होते. तिने २ मे, २०१४ रोजी ‘दिया और बाती हम’ या मालिकेचे दिग्दर्शक रोहित राज गोयल यांच्यासोबत लग्न केले होते. यानंतर तिने आपल्या पहिल्या मुलाला २० मे, २०१८ रोजी जन्म दिला होता. दीपिकाने ‘दिया और बाती हम’ या मालिकेनंतर याच मालिकेचा सिक्वल ‘तू सुरज मैं सांझ पियाजी’मध्ये कॅमियो रोलही साकारला होता.

हे देखील वाचा