‘तुझ्यापेक्षा लहान मूलं चांगला डान्स करतात’, डान्स व्हिडिओमुळे दीपिका सिंग पुन्हा झाली ट्रोल


टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री दीपिका सिंग ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी जेव्हा तौक्ते वादळ आले होते, तेव्हा तिने पडलेल्या झाडाखाली फोटोशूट केले होते. त्यामुळेही तिला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. आता तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचा डान्स. (Deepika Singh share new dance video on social media)

अभिनेत्री दीपिका सिंगने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण युजर्सला तिच्या या गाण्यावरील डान्स स्टेप्स काही खास आवडल्या नाहीत.

एका युजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “अजूनही सांग की, तुला डान्स करता येत नाही.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “तुझ्यापेक्षा तर लहान मूलं चांगला डान्स करतात.” तसेच अनेकांना तिचा हा डान्स आवडला आहे. अनेक चाहते तिच्या या डान्सचे कौतुक देखील करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी तौक्ते वादळ आले होते. ज्याचा धोका संपूर्ण देशाला होता, तेव्हा संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले होते. जोरात वादळ होतं. ही परिस्थिती पाहून सगळेजण आपल्या सुरक्षेची काळजी घेत होते. यातच दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला होता. तिने तुटलेल्या झाडासोबत केवळ फोटोशूट नाही केले, तर पावसात भिजताना डान्स देखील केला होता. यावेळी तिच्यावर निशाणा साधत प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते.

दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.