शुभमंगल सावधान! महिला पंडितने लावले दीया मिर्झाचे लग्न, चर्चेचा विषय बनतोय ‘हा’ फोटो


बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा आणि वैभव रेखा यांच्या लग्नाची आजकाल बरीच चर्चा होत आहे. कधी दीयाची मेहंदी, कधी तिच्या पती वैभव रेखासोबत तर कधी वरमाला घालत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता चर्चेचा नवीन विषय समोर आला आहे, तो म्हणजे लग्न लावणारी महिला पंडित.

वास्तविक, दीया मिर्झा आणि वैभव रेखी यांचे लग्न एका महिला पंडितने लावले होते. दीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दीया आणि वैभव लग्नाच्या मंडपात बसले आहेत आणि एक महिला पंडित मंत्र पठण करताना दिसत आहे. फोटोमध्ये महिला पंडित, दीया आणि वैभव हवन कुंडमध्ये आहुति देताना दिसले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोंची बरीच चर्चाही होत आहे.

एका फोटोमध्ये दीया मिर्झा वैभव रेखाच्या गळ्यात हार घालताना दिसत आहे. या फोटोत दोघेही खूप आनंदी आहेत. या विधीच्या वेळी वैभव मस्तीच्या मुडमध्ये दिसत होता. दुसऱ्या फोटोत दिया मिर्झा आणि वैभव रेखी फेरे घेताना दिसत आहेत. वैभव पुढे आणि त्याच्या मागे दीया चालत आहे. फोटोमध्ये वैभव दीयाचा हात पकडताना दिसत आहे. पुढच्या फोटोत दीया आणि वैभव आशीर्वाद घेत आहेत. या वेळी या नवविवाहित जोडप्यावर फुले व अक्षता टाकल्या जात आहेत.

लग्नानंतर दीया मिर्झा आणि वैभव रेखीसोबत बाहेर आले आणि फोटोसाठी मीडियाला पोजही दिले. यानंतर, दीयाने फोटोग्राफर आणि लग्नाच्या ठिकाणी बाहेर उभे असलेल्या लोकांना मिठाई देखील दिली. हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दीया मिर्झा वैभव रेखीसोबत पोज देताना दिसली. दीयाने लाल बनारसी साडीवर पोलकीचे दागिने घालुन कपाळावर एक लहान लाल टिकली लावली आहे. त्याच वेळी वैभवने पांढर्‍या कुर्ता-पायजामासह सोनेरी रंगाची पगडी बांधली होती. या दोघांची जोडी खूपच गोंडस दिसत होती.

दीया मिर्झाने इंस्टाग्रामवर हातावर मेहंदी काढलेलाही एक फोटो शेअर केला आहे. दीयाचे हात मेहंदीने अतिशय तेजस्वी दिसत आहेत. फोटोमध्ये दीयाच्या मनगटावरील टॅटूही आपण पाहू शकता.


Leave A Reply

Your email address will not be published.