दिशा पटानी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि लक्षवेधी अभिनेत्री आहे. तरुणांमध्ये तिची एक वेगळीच क्रेझ आहे. तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज नेहमीच सगळ्यांच्या पसंतीस उतरत असतो. सोशल मीडियावर तिने कोणतीही पोस्ट केल्यास ती वेगाने व्हायरल होत असते. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून ही गोष्ट लक्षात येते की, फिरण्याची खूप आवड आहे. ती अनेकवेळा बीचवर व्हॅकेशनसाठी जात असते. अनेकवेळा तिचे बिकिनी फोटो ती शेअर करत असते. अशातच तिने आता तिचा एका बिकिनी फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे.
दिशाने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. ती समुद्रात लाटांमध्ये झोपलेली दिसत आहे. फोटोमधील तिचा हा अंदाज सगळ्यांना खूप आवडला आहे. या आधी देखील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांचे काही विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. (Actress disha patani share her white bikini photo on social media)
तिच्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या या फोटोवर अभिनेत्री सायरा खानने फायर ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच तिच्या या फोटोला टायगर श्रॉफने देखील लाईक केले आहे.
दिशा ही फिटनेस प्रेमी अभिनेत्री आहे. ती बऱ्याचवेळा तिचे वर्कआउट करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यासोबतच दिशाचा फॅशन सेन्स देखील कमालीचा आहे.
दिशा पटानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती या आधी शेवटची सलमान खानसोबत ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात दिसले होती. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तसेच या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी तिच्या मोठ्या भावाचे पात्र निभावले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा
–अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’
–‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी