बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे माध्यमांचे लक्ष वेधत असते. कधी ती तिच्या सिनेमामुळे, तर कधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा वाढवत असते. दिशाचे नाव त्या अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे, ज्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. तिच्या सर्वात वेगळ्या आऊटफिटमुळे चाहत्यांसोबतच कलाकारांच्याही नजरा त्यांच्यावर असतात. अशात अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती दिशाच्या ड्रेसकडे एकटक पाहत होता. त्याला दिशाच्या ड्रेसवरून नजरच हटवू वाटत नव्हती. यादरम्यान तो कॅमेऱ्यात कैद झाला.
दिशाचा बेधुंद करणारा ड्रेस
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी (Disha Patani) ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. एकदा तिने असे काही कपडे परिधान करून पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली की, पाहणारेही पाहतच राहिले. सन २०१७ मध्ये मुंबईत ६२वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला होता. मात्र, जेव्हा या पुरस्कार सोहळ्यात जेव्हा दिशा पोहोचली, तेव्हा तिच्यावर सर्वांच्या नजरा भिडल्या होत्या. या सोहळ्यात दिशा खूपच रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून पोहोचली होती. अभिनेत्रीचा असा अवतार पाहून एक व्यक्ती स्वत:ला रोखू शकला नाही.
एकटक राहिला पाहत
या पुरस्कार सोहळ्यात दिशाने डीप क्लीवेज असणारा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या सोहळ्यात तिच्या ड्रेसने सर्वांनाच आकर्षित केले होते. यादरम्यान कॅमेऱ्यात असा क्षण कैद झाला, ज्यानंतर दिशाला कदाचित खूपच अस्वस्थ वाटले असावे. खरं तर, दिशाच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती बसला होता. जो तिच्याकडे एकटक पाहत होता. दुसरीकडे, दिशाला या गोष्टीबद्दल माहिती नव्हते. जेव्हा हा शो टेलिकास्ट झाला, तेव्हा या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधले.
View this post on Instagram
दिशाचे सिनेमे
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘राधे’ या सिनेमात सलमान खान याच्यासोबत झळकली होती. हा सिनेमा ईदच्या खास दिवशी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत ‘एक व्हिलन २’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काटा किर्रर्र! सर्वाधिक रोमान्सने भरलेले गाणे घेऊन आला खेसारी, अर्शीसोबतच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष
एकीकडे कोर्टाची नोटीस, तर दुसरीकडे कोरोनाची लागण; संकटात सापडले ‘हे’ दिग्दर्शक