Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी काटा किर्रर्र! सर्वाधिक रोमान्सने भरलेले गाणे घेऊन आला खेसारी, अर्शीसोबतच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

काटा किर्रर्र! सर्वाधिक रोमान्सने भरलेले गाणे घेऊन आला खेसारी, अर्शीसोबतच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

भोजपुरी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि गाण्यांमुळे भलामोठा चाहतावर्ग तयार करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये खेसारी लाल यादव याचाही समावेश होतो. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वीच खेसारीची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. यामध्ये ‘कोका कोला बोलबम’, ‘वरदान चाही तीन’, ‘ले आई कोका कोला’, ‘ब्रँडेड भक्त’ या गाण्यांचा समावेश आहे. त्याची ही सर्व गाणी लाखो व्ह्यूजच्या क्लबमध्ये सामील झाली आहेत. अशात त्याचे एक रोमँटिक गाणे चाहत्यांना भलतेच आवडत आहे. यामध्ये तो एका अभिनेत्रीसोबत दिसत आहे.

चाहत्यांच्या पसंतीस उतरत असलेल्या खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याच्या गाण्याचे नाव ‘नथुनिया’ (Nathuniya) असे आहे. या गाण्यात तो अभिनेत्री अर्शिया अर्शी (Arshiya Arshi) हिच्यासोबत दिसत आहे. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. त्यांच्या केमिस्ट्रीवर चाहते प्रेमाचा रंग उधळत आहेत. त्यामुळेच या गाण्याला युट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्यात अर्शी सिझलिंग परफॉर्मन्स देत आहे. तसेच, खेसारी तिला हातांनी गोंजारताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दोघांची जोडी चाहत्यांची मने जिंकत आहे. हे गाणे प्रेमात असलेल्या जोडप्यांमध्ये विशेष प्रसिद्ध होत आहे. कारण, हे गाणे रोमान्सने भरलेले आहे. हे गाणे चाहत्यांमध्ये प्रेमाची भावना जागी करणारे आहे.

हे गाणे २ मे, २०२२ रोजी सारेगामा हम भोजपुरी या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला अवघ्या २ महिन्यात १३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओतील अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक आणि तिचे एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत. दुसरीकडे, खेसारी लाल यादव याची पाश्चिमात्य स्टाईल चाहत्यांना आवडत आहे.

गाण्याबाबत बोलायचं झालं, तर हे गाणे प्रियांका सिंग आणि खेसारी लाल यादव यांनी गायले आहे. या गाण्याचे संगीत आणि बोल कृष्ण बेदर्दी यांनी लिहिले आहेत. दुसरीकडे, या गाण्यातील सेन्शुअल मूव्हज असणारी कोरिओग्राफी बिक्रम पासवान आणि प्रेम बाबू यांनी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

एकीकडे कोर्टाची नोटीस, तर दुसरीकडे कोरोनाची लागण; संकटात सापडले ‘हे’ दिग्दर्शक

अर्रर्र! प्रितमने ढापलंय ‘केसरिया’ गाणं? ट्विटरवर चाहत्याचा प्रश्न; नेटकऱ्यांकडून सोशलवर मीम्सचा महापूर

अभिनेता नाही, तर ‘डॉक्टर स्ट्रेंज’ला बनायचे होते वकील, ‘या’ कारणामुळे भारतात घालवले एक वर्ष

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा