‘शीर कोरमा’ चित्रपटासाठी दिव्या दत्ताला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार


दिव्या दत्ता एक असाधारण अभिनेत्री आहे जी, चित्रपटांमध्ये जीव ओतून काम करते. तिच्या चोख कामगिरीने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. ती इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या चित्रपटातील भूमिका समजून घेत उत्तमरित्या पार पाडते. त्यामुळे ती नेहमीच तिच्या चित्रपटातील भूमिकांमुळे चर्चेचा विषय बनत असते. ‘भाग मिल्खा भाग’, वीर-जारा’ आणि ‘बदलापुर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. दिव्या दत्ताने डीएफडब्ल्यू साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘शीर कोरमा’ या शॉर्ट फिल्ममधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार तिला १८ ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या डॅलस येथे देण्यात आला. हा चित्रपट जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये खूप कौतुक आणि प्रसिद्धी मिळवत आहे.

फराज अन्सारी दिग्दर्शित ‘शीर कोरमा’मध्ये शबाना आझमी, दिव्या दत्ता आणि स्वरा भास्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची एक हृदयस्पर्शी कथा आहे, जी एलजीबीटीक्यूए प्लस (LGBTQA+) समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहे. दिव्याने अमेरिकेतील एका कार्यक्रमात आपले दुसरे पुस्तकही लाँच केले आहे. ‘द स्टार्स इन माय स्काय’ नावाच्या पुस्तकात तिने तिचे अविस्मरणीय अनुभव आणि चित्रपट विश्वातील कळकरांसोबतचे अनुभव, विविध किस्से तिचा आतापर्यंतचा प्रवासा हे सर्व नमूद केले आहे.

यावेळी बोलताना दिव्या दत्ता म्हणाली की, “जगभरातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळणारा असा प्रतिसाद पाहून मी खूप भावनिक झाले आहे. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. शिवाय हा अमेरिका दौरा देखील मला वैयक्तिकरित्या खूप समाधान देणारा ठरत आहे.” दिव्याचे हे नवीन पुस्तक २५ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

दिव्या तिच्या पुढील दोन चित्रपट ‘धाकड’ आणि ‘शर्मा जी की बेटी’बद्दल खूप उत्साहित आहे. ‘धाकड’ सिनेमात ती कंगना रणौतसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. अर्जुन रामपाल आणि ॲपलॉज एंटरटेनमेंटच्या ‘शर्मा जी की बेटी’ दोन्हीही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी


Leave A Reply

Your email address will not be published.