Monday, July 8, 2024

कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “तुमच्या…”

स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने खूप कमी वेळात लोकप्रिया मिळवली आहे. या मालिकेची कहाणी खूप गोल गोल फिरणारी आहे. यातील पात्र नवीव असल्यामुळे प्रेक्षक देखील ही मालिका आवडीने पाहत आहेत. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या गोड स्वभावाने अल्पावधीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत असणारी नायिका ही खूपच सोज्वळ आणि त्यागी दाखवली जाते. परंतु या मालिकेतील अप्पूचे नटखट आणि बिनधास्त पात्र सगळ्यांना वेड लावणारे आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar)घराघरात पोहोचली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

ज्ञानदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या पोस्ट पाहून नेटकरी तिचे कधी कौतुक करतात, तर कधी तिला ट्रोल करत असतात. नुकतचं ज्ञानदाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहेत. त्या फोटोमुळे ज्ञानदाला खूप ट्रोल केले जात आहे. यावर अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिले आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करताना ज्ञानदाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जस्ट चिलीन” यावर नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट केले आहे. काहींनी त्यावर कमेंट करत लिहिले की, ‘कसाटा आईस्क्रीम’. यावर दुसऱ्याने लिहिले की, “कापड कमी पडलं वाटतं.”

या युजरला उत्तर देताना ज्ञानदाने लिहिले की, “कपडे नाही तुमच्या विचारांची पोच कमी पडली” त्यानंतर सोशल मीडियावर तिची ही पोस्ट खूप व्हायल होत आहे. ज्ञानदा विषयी बोलायच झाले तर, याआधी तिने ‘सख्या रे’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता.

अधिक वाचा-
बाबो..!! मालिकेच्या शुटिंगवेळी सेटवर आला बिबट्या, सर्वांची एकच धावपळ, महाराष्ट्रातील घटना
पंधरा वर्षाची असताना ‘या’ प्रसिद्ध गायकाने श्वेता पंडितवर केले होते लैंगिक अत्याचार? वाचा ‘ती’ घटना

हे देखील वाचा