Sunday, May 19, 2024

बाबो..!! मालिकेच्या शुटिंगवेळी सेटवर आला बिबट्या, सर्वांची एकच धावपळ, महाराष्ट्रातील घटना

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम बालकलाकार मायरा वायकुळची सोशल मीडियावर सतत चर्चेत येते. तिने खूप कमी वेळात चाहत्यांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे. तिची आता नविन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच नाव ‘नीरजा’ला असे आहे. तिच्या या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्याला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. टीव्ही शो ‘नीरजा’च्या सेटवरुन एक धक्कादासक प्रकार समोर आला आहे.

‘नीरजा’च्या  (neerja)सेटवर बिबट्या घुसल्याने गोंधळ झाला आहे. बिबट्या घुसल्याने सर्वंत्र भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. सेटवरील लोकांची अवस्था वाईट झाली. नुकतेच ‘नीरजा’च्या सुरुवातीचे काही भाग कोलकातामध्ये शूट करण्यात आले. त्यानंतर मुंबई फिल्मसिटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे शोचे संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित होते. दरम्यान एक बिबट्या तेथे आला आणि सर्वांच घाबरवून गेला.

मुंबईतील गोरेगाव परिसरात पसरलेल्या जंगलात बिबट्यांसह इतर वन्य प्राणी आहेत. त्यामुळे ते जवळपास राहणाऱ्या लोकांना ते दिसतात. अनेकवेळा वन्य प्राण्यांनी सेटवर प्रवेश केला आहे. यावेळीही तसेच झाले. माध्यमातील वृत्तानुसार, बिबट्या नीरजाच्या सेटवर बाल्कनीतून घुसला. तेथिल एक व्हिडिओ सोशल मीडियार चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्या पाऊस असल्यामुळे छतावर अनेक माकडे बसली होती. त्याच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने बिबट्याने सेटमध्ये प्रवेश केला. मात्र लोकांची गर्दी पाहून तो माघारी फिरला. बिबट्या लगेच गेला असला तरी तेथील लोकांची चांगलीच खळबळ उडाली.

टीव्ही शो ‘नीरजा: एक नई पहा’बद्दल बोलायच झाल तर, हा शो कलर्स वाहिनीवर 10 जुलैपासून सुरू होणार आहे. या शोमध्ये स्नेहा वाघ आणि काम्या पंजाबी दिसणार आहेत. या शोचे प्रोमोज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

अधिक वाचा- 
रसिकाच्या फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा फाेटाे पाहा
मास्टर शेफने हुमा कुरेशीला किस करण्यापूर्वी केले ‘हे’ काम, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा