Saturday, March 2, 2024

‘मी त्या निर्मात्यासोबत एक रात्र घालवायला नकार दिल्यामुळे त्याने…’, ईशा गुप्ताने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

बॉलिवूड वरवर बघताना सर्वांना खूपच मोहक वाटते. यात असणारा पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धी, लोकप्रियता पाहून अनेकांना त्याची भुरळ पडते. मात्र जसे हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तसेच सर्व माणसे चांगली असतात असे नाही. जिथे चांगली माणसं असतात तिथे वाईट माणसेही असतातच असतात. बॉलिवूड असेही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते आणि बहुतकरून बॉलिवूडबद्दल अनेक वाईट गोष्टीच समोर येत असतात. बॉलिवूडमध्ये अतिशय सामान्य झालेला एक शब्द म्हणजे ‘कास्टिंग काऊच’. अभिनेत्रींना किंबहुना अभिनेत्यांना देखील या घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागते. या प्रकाराबद्दल अनेक कलाकार समोर येऊन त्यांचा अनुभव सांगतात. असाच एक अनुभव अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकताच सांगितला आहे.

ईशाने सांगितले की, “इंडस्ट्रीमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या तूलनेत स्टार्सकिड्सला खूपच कमी त्रास होतो. मला एक निर्माता चित्रपटातून काढण्यासाठी खूपच तत्पर होता याचे कारण म्हणजे मी त्याच्यासोबत रात्र घालवण्यास नकार दिला होता.” पुढे ईशा म्हणाली की, “माझ्या संघर्षाच्या काळात मी मेकअप आर्टिस्टसोबत रूम शेअर करत होती. याचे कारण म्हणजे मला भुताची भीती वगैरे होती असे नाही तर मला भीती होती एका माणसाची. त्यामुळेच मी एकटे झोपण्यासाठी घाबरायची.”

ईशा म्हणाली, “मी एका व्यक्तीचे खूप घाणेरडे रूप पहिले होते. त्यामुळे घाबरली होती, शूटिंगच्या मधेच त्या निर्मात्याने सांगितले की, त्याला मला चित्रपटातून काढून टाकायचे आहे. कारण मी त्याच्यासोबत एक रात्र घालवण्यास नकार दिला होता. तोपर्यंत मी पाच दिवसांचे शूटिंग केले होते. मात्र हे सर्व कलाकारांच्या मुलांना नाही शान करावे लागत. कारण अशा लोकांना माहित असते की, त्यांनी असे काही केले तर त्या मुलांचे पालक त्यांना मारून टाकतील.”

ईशाने इमरान हाश्मीसोबत जन्नत २ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती राज 3, रुस्तम, बादशाहो, कमांडो २ ही या सिनेमांसोबतच ती काही तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा