Tuesday, July 9, 2024

रिएलिटी शोमधून मिळाली मोठी संधी, अशाप्रकारे फरीदा जलाल बनल्या राजेश खन्ना यांच्या अभिनेत्री

बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री फरिदा जलालने त्यांच्या अभिनयाने सर्वांना भुरळ घातली. अत्यंत सुंदर आणि सोज्वळ फरीदा यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मागील 5 दशकापासून त्या बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी तमिळ, तेलुगू सहित बाकी अनेक भाषांमध्ये काम केले आहे. अशातच त्या मंगळवारी (14 मार्च) रोजी त्यांचा 73वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास माहिती.

फिल्म फेअरमध्ये माधुरीच्या एका इव्हेंटमध्ये राजेश खन्ना यांना हिरो म्हणून आणि फरीदा जलाल या अभिनेत्री म्हणून पुढे आल्या. या इव्हें मध्ये तारा चंद बडजात्याने त्यांना ऑफर दिली. चित्रपटात त्या डेनी देजोंगप्पासोबत दिसल्या होत्या. त्या दोघांना सोबत सगळ्यांनी खूप पसंत केले होते. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. ‘आराधना’मध्ये फरीद जलाल राजेश खन्ना यांच्या विरोधात दिसले होते. त्यांचा अभिनय देखील सगळ्यांना आवडला होता.

फरीदा यांनी त्यांच्या करीअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. परंतु करीअरमध्ये 90 च्या दशकात त्यांनी त्यांच्या करिअरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. 1996 मध्ये त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये काजोलच्या आईचे पात्र निभावले होते. त्यानंतर त्यांनी अनेक आई आणि आजीचे पात्र निभावले. दिग्दर्शक देखील त्यांना या पात्रासाठी सर्व प्रथम घेत असायचे. त्यांनी असे अनेक पात्र निभावले आहे जे आजही अनेकांना लक्षात आहेत.

कुछ कुछ होता है                                                                                                                 ‘कुछ कुछ होता है’ मध्ये फरीदा यांनी शाहरुख खानसोबत काम केले होते. यात त्या अंजलीच्या मुलाची कशी काळजी घेत असायच्या हे दाखवले आहे. त्यांचे हे पात्र देखील खूप गाजले होते. अनेकांनी त्यांच्या या पात्राला पसंती दर्शवली होती.

कभी खुशी कभी गम                                                                                                          ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात देखील त्यांनी काजोलच्या शेजारीणच्या भूमिकेत होत्या. जी काजलला तिच्या मुलीप्रमाणे मनात होती. या चित्रपटातील तिच्या भाइनायाचे खूप कौतुक झाले होते,

शरारत
शरारत या मालिकेत देखील त्यांनी काम करून त्यांनी चांगली लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अशा अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.(actress farida jalala celebrate her birtday lets know about her career)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

करण कुंद्राच्या ट्विटवर उत्तर देताना तेजस्वीने केला त्यांच्या नात्याबद्दल महत्वाचा खुलासा म्हणाली, “मी अंधविश्वासू आहे…’

हे देखील वाचा