Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड ‘कोई मिल गया’ फेम हंसिका मोटवानी अडकणार लग्न बंधनात?

‘कोई मिल गया’ फेम हंसिका मोटवानी अडकणार लग्न बंधनात?

हिंदी सिनेसृष्टी व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीमध्येही हंसिका मोटवानी हिने आपल्या अभिनयाची छाप साेडली. तिने ‘एंगेयम काधल’, ‘वेलायुधम’, ‘ओरू कल ओरू कन्नड’, ‘थेया वेलाई सियानुम कुमारू’ आणि ‘सिंघम 2’ यासह अनेक दक्षिण सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अशातच अभिनेत्री वैवाहिक जीवनात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस जयपूरच्या प्रसिद्ध किल्ल्यामध्ये अभिनेत्रीचे लग्न होणार आहे. सध्या अभिनेत्री हंसिक लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अभिनेत्रीचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने होणार आहे. लग्नाचे ठिकाण 450 वर्षे जुना राजवाडा आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्री हांसिका माेटवाली (Hansika Motwani) हिचा विवाह सोहळा जयपूरमधील ‘मुंडोटा फोर्ट अॅन्ड  पॅलेस’मध्ये होणार आहे. डिसेंबरमध्ये हंसिकाच्या लग्नाचे आयोजन करण्यासाठी पॅलेसमध्ये काम सुरू आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात पाहुण्यांच्या आगमनापूर्वी पुर्ण तयारी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांन कळून मिळत आहे. मात्र, अभिनेत्रीच्या लग्नाची तारखेबद्दल अद्याप काेणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

अभिनेत्रीने अनेक टीव्ही शोमध्येही केले आहे काम 
हंसिकाने ‘शाका लाका बूम बूम’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘सोन परी’ या सारख्या दमदार टीव्ही मालिकांमधून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने ऋतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ मध्येही प्रमुख भूमिका साकारली होती. ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून हंसिका मोटवानी खूप लोकप्रिय झाली.

हंसिकाने 2007 मध्ये हिमेश रेशमियासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून ‘आपका सुरूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘मनी है तो हनी है’मध्येही दिसली. मात्र, अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकली नाही, त्यानंतर ती साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. अभिनेत्रीने दक्षिणेतील एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले असून लवकरच तिचा ‘राउडी बेबी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
मोठी घोषणा! राज ठाकरे छत्रपती शिवरायांवर बनवणार सिनेमा, 3 भागात होणार रिलीज

आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, ‘मी तुझ्यासाठी जीव पण…’

हे देखील वाचा