Friday, February 21, 2025
Home बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेत्री हेलन एका दशकानंतर परतणार मोठ्या पडद्यावर, करिश्मा कपूरसोबत ‘या’ चित्रपटात करणार धमाल

ज्येष्ठ अभिनेत्री हेलन एका दशकानंतर परतणार मोठ्या पडद्यावर, करिश्मा कपूरसोबत ‘या’ चित्रपटात करणार धमाल

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री हेलेन (Helen) बराच काळ सिने जगतापासून लांब राहिल्या आहेत. आता तब्बल दशकानंतर त्या रुपेरी पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. अनुभवी हेलेन डेली बेलीचे दिग्दर्शक अभिनय देव यांच्या ब्राऊन मधून पून्हा एकदा पडद्यावर झळकणार आहेत. याच सिरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरही (karishma kapoor)  मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. जाणून घेऊ या त्यांच्या या सिरीजबद्दलची माहिती

समोर आलेल्या माहितीनुसार, हेलन आणि करिश्मा कपूर यांची ही सिरीज महिलांच्या प्रश्नांवर लक्ष वेधणारी असेल. ही संपूर्ण वेबसिरीज अभिक बरुआच्या सिटी ऑफ डेथ या पुस्तकावर आधारित आहे. या सिरीजमध्ये हेलेन आणि करिश्मा यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. सिरीजमध्ये करिश्मा आणि हेलेन यांच्यासोबत अभिनेता सुर्य शर्मा च्याही लक्षवेधक भूमिका पाहायला मिळणार आहेत.मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी आत्तापर्तंत या बद्दलची अधिकृत घोषणा  सांगितलेली नाही.

बऱ्याच काळानंतर पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या हेलन यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना, “मला जेव्हा यासाठी पहिल्यांदा संपर्क साधण्यात आला त्यावेळी माझ्या भूमिकेसाठी निर्माते किती उत्सुक आहेत हे लगेच लक्षात आले. ही फक्त क्राईम स्टोरी नाही तर मला नवीन ओळख देणारी भूमिका आहे. ही साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. सोबतच सेटवर पून्हा एकदा येण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे,” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

याबद्दल पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्यासाठी आता बऱ्याच वर्षानंतर सेटवर आल्यानंतर झालेले सगळे बदल खूपच आश्चर्यकारक होते. मात्र हे बदल पाहून मला आनंदही झाला.”  दरम्यान अभिनेत्री हेलन यांनी बॉलिवूडमध्ये तब्बल ७५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दिला १९५१ मध्ये सुरूवात केली होती. त्यांनी मधुर भांडारकरच्या हिरॉईन या चित्रपटात शेवटचे काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा