×

‘तुझा चश्मा आधी नीट करुन घे’, म्हणत पान मसाल्याच्या पोस्टवरून सुनील शेट्टीने चाहत्याला फटकारले

काही दिवसांपासून हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचे अभिनेते शाहरुख खान (Shahrukh Khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि अक्षय कुमारला (Akshay kumar) त्यांच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. या जाहिरातीमुळे असे सुपरस्टार अभिनेते चुकीचा संदेश पोहोचवतात असे बोलण्यात आले होते. ज्यामुळे या कलाकारांना माफी मागावी लागली होती. मात्र याच विषयावर एका व्यक्तीने अभिनेता सुनिल शेट्टीचेही (Suniel Shetty) नाव जोडल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. यावर अभिनेता सुनील शेट्टीनेही त्या चाहत्याला खडेबोल सुनावले आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेला लावलेल्या पान मसाल्याच्या होर्डिंगचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत “रस्त्याच्या कडेला इतक्या जाहिराती पाहिल्या की आता मलाही गुटखा खायची इच्छा झाली आहे,” अशी टीका करणारा कॅप्शन दिला होता. सोबतच या व्यक्तीने गुटखा किंग असा टॅर देत शाहरुख खान, अक्षय कुमारला टॅग केले सोबतच चुकीचा संदेश देताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे म्हणत जोरदार टिका केली. मात्र या व्यक्तीकडून अजय देवगण ऐवजी अभिनेता सुनील शेट्टीलाही यामध्ये टॅग केले गेले ज्यामुळे सुनील शेट्टीने आपला संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

अभिनेता सुनील शेट्टीने या फोटोवर प्रतिक्रिया देताना त्या नेटकऱ्याला “तु तुझा चश्मा आधी नीट करुन घे” अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर या व्यक्तीने सुनील शेट्टीची माफी मागत मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, त्या ठिकाणी अजय देवगणचे नाव पाहिजे होते चुकून तुमचे नाव लिहले गेले असे म्हणत माफी मागितली आहे. मात्र या व्यक्तीला या पोस्टमुळे इतर नेटकऱ्यांच्याही रोशाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सुनील शेट्टीच्या चाहत्यांनीही त्याला या चुकीबद्दल खडे बोल सुनावले आहेत. तर काही जणांनी या व्यक्तीने तात्काळ माफी मागितल्याबद्दल त्याचे कौतुकही केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post