अभिनेत्री हिना खान ही फक्त आता छोट्या पडद्यापुरती मर्यादित राहिली नाहीये. हिनाने रुपेरी पडद्यावरही झळकली आहे. हिनाला कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. हिना तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशात तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हिनाचा व्हायरल व्हिडिओ
नुकतेच हिना खान (Hina Khan) हिने असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून प्रत्येकजण हैराण होतोय. खरं तर, हिनाने इंस्टाग्रामवर रील्स शेअर केले आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीला चापट मारताना दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, अभिनेत्री लिपस्टिक लावत असते, तेव्हाच एक व्यक्ती तिची लिपस्टिक हिसकावून घेतो. त्यावेळी रागाच्या भरात हिना त्याला चापट मारते. यादरम्यान हिना ‘इश्क’ या सिनेमातील जूही चावला (Juhi Chawla) हिचा डायलॉग बोलताना दिसते. ती म्हणते की, “आईंदा मेरे साथ ऐसा मजाक किया ना तो मुंह तोड दुंगी.” यादरम्यान हिनाने नारंगी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओवर चाहत्यांची प्रतिक्रिया
हा व्हिडिओ शेअर करत हिना खान हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा मेकअपला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली. काय परफॉर्म केलाय तू.” हिनाचे हे मजेशीर रील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, चाहत्यांनाही हा खूपच आवडला आहे. चाहत्यांव्यतिरिक्त अभिनेता शाहीर शेख याच्यासह अनेक कलाकार या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेत्री हिना खान हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. यातील तिची ‘अक्षरा’ ही भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. फक्त टीव्ही मालिकाच नाही, तर तिने ‘हॅक्ड’ या सिनेमातही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! कॉमेडियन भारती सिंगने सर्वांसमोर केले दाक्षिणात्य अभिनेत्याला किस, व्हिडिओ तुफान व्हायरल
काय सांगता! हॉलिवूडच्या ‘या’ जोडीने एकाच महिन्यात केले दुसऱ्यांदा लग्न
बापरे! क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यालाच घातला लाखोंचा गंडा, पाहा काय आहे प्रकरण