छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत, ज्या कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकीच एक मालिका म्हणजे, झी मराठीवरील ‘बस बाई बस’ ही होय. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात दरवेळी नवनवीन कलाकार मंडळी हजेरी लावताना दिसतात. काही आठवड्यांपूर्वी महिला राजकारण्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर मागच्या आठवड्यात मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर या कार्यक्रमाचा भाग बनली होती. आता या आठवड्यात छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यादरम्यान तिने धक्कादायक वक्तव्य केले आहे.
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. तो कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना बोलतं करत असतो. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला तो प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर हो किंवा नाही अशा पद्धतीने द्यायची असतात. यामध्ये सुबोधने अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) हिलाही प्रश्न विचारले. तो म्हणाला की, “सिनेमात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना कमी लेखतात का?” या प्रश्नाचे उत्तर देताना ऋताने ‘होय’ म्हटले. तिने दिलेल्या या उत्तरामुळे सर्वजण हैराण झाले.
खुद्द सुबोधही तिला म्हणाला की, “कोण आहेत असे? मला सांग जरा.” यावर ऋता “नाही, मी त्यांची नावे सांगणार नाही, पण हे एविडेंट आहे. सेटवर त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून, त्यांच्या वाईब्सवरून समजते.” सुबोध तिला म्हणाला की, “म्हणजे ते कलाकार मोठ्या पडद्यावर दिसतात म्हणून ते स्वत:ला भारी समजतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावर दिसता म्हणून तुम्हाला कमी लेखतात?”, या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, “मला खरं माहिती नाही, पण एक गोष्ट आहे की, टेलिव्हिजन कलाकार फार प्रसिद्ध असतात. कारण, ते दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचतात.”
यानंतर सुबोध तिला पुढचा प्रश्न विचारतो की, “थोडंही वजन वाढलेल्या अभिनेत्रीला प्रेक्षक सहजासहजी स्वीकारत नाहीत, का?” या प्रश्नाचे उत्तर देताना ऋता म्हणाली की, “कदाचित सौंदर्य मानके.” यावर सुबोध म्हणतो की, “कुणी सांगितलं?” पुढे ऋता म्हणते की, “हो, कुणी ठरवलं हा तर प्रश्नच आहे.”
View this post on Instagram
यानंतर सुबोधने असा प्रश्नही उपस्थित केला की, “आपण आता इतकं बदलले आहोत की, देवता असतात, मूर्ती असतात त्यांनाही आपण सिक्स पॅक्स दाखवत आहोत. जरी त्यांना ते नसले तरीही ते दाखवतो, पण त्यामुळे आपली श्रद्धा कमी होईल का??”
आता अभिनेत्री ऋता दुर्गुळेने केलेली ही वक्तव्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कधीकाळी चॉकलेट-चिंगम आणि कॅसेट विकायचे मधुर भांडारकर, स्वत:वर विश्वास ठेवल्याने आज आहेत सुपरहिट दिग्दर्शक
भाईजानला बॉलिवूडमध्ये ३४ वर्ष पुर्ण, खास व्हिडिओ शेअर करत केली ‘ही’ मोठी घोषणा
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी विजयने पाच पटींनी वाढवलं मानधन, अनन्या पांडे तर जवळपासही नाही