Thursday, May 23, 2024

काय सांगता! ‘टाईमपास ३’ च्या सेटवर ऋता दुर्गुळेचा झालेला अपमान? कलाकारांनीच सांगितला संपूर्ण किस्सा

मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या तिच्या दमदार चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. ऋताचा ‘अनन्या’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. ज्यामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. चित्रपटात ऋताने एक आव्हानात्मक भूमिका साकारली होती. अनन्या नंतर ऋता सध्या तिच्या टाईमपास ३ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तत्पुर्वी चित्रपटाच्या सेटवर ऋताचा जोरदार अपमान झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाईमपास ३’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याआधी चित्रपटाचे आलेले दोन्ही भाग प्रचंड गाजल्याने या चित्रपटाचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. टाईमपास ३ चित्रपटात अनेक नवीन चेहरे आणि वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाची प्रेक्षकांनाही आतुरता लागली आहे. चित्रपटात दगडू परब आणि पालवी पाटीलची भन्नाट लवस्टोरी पाहायला मिळणार आहे.ज्यामध्ये दगडूची भूमिका अभिनेता प्रथमेश परब तर पालवीची भूमिका ऋता दुर्गुळे साकारणार आहे. चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू असतानाच सेटवर ऋताचा अपमान झाल्याची  बातमी समोर आली आहे. खुद्द चित्रपटाच्या कलाकारांनीच याबद्दलचा खुलासा केला आहे.

ऋताच्या या अपमानाबद्दल बोलताना अभिनेता मनमीत फेमने सांगितले की, “आम्ही सर्वजणच ऋतासोबत चांगले वागले आहोत. परंतु चित्रपटातील कलारा जयेशकडून तिचा नकळत अपमान झाला. हा किस्सा साई तुझ लेकरु गाण्याबद्दल चर्चा सुरू असताना झाला होता. यावेळी सर्वजणच या गाण्याबद्दल चर्चा करत होते. त्यावेळीच ऋताने अरेरे मी गाण्याचा भाग नाहीये अस गमतीने म्हणताच त्यावर जयेशने ताबडतोब हा मग मजा येईल असे उत्तर दिले. जयेशच्या या वाक्याने अपमानित झालेली ऋता चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली.”

दरम्यान चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग असेच खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचेही त्याने पुढे बोलताना सांगितले. हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाच –

शेवटी सापडला! रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचा पहिला खुलासा, म्हणाला ‘तो २ तास उघडाच…’

अबब! ‘या’ एका सवयीमुळे चक्क सेटवर म्हशी बांधणारा अवलिया, ‘शोले’ च्या गब्बरचा असा आहे सिनेप्रवास

श्रीदेवी शेर, तर अमिताभ सव्वाशेर! कामंच करायचं नाही म्हणून बसलेल्या अभिनेत्रीला महानायकांनी ‘असं’ पटवलेलं

हे देखील वाचा