Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड इलियाना डिक्रुझची ‘बॉडी’बद्दल दमदार पोस्ट, विना फिल्टर बिकिनी फोटो व्हायरल

इलियाना डिक्रुझची ‘बॉडी’बद्दल दमदार पोस्ट, विना फिल्टर बिकिनी फोटो व्हायरल

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेत असतात. आपले नवनवीन सुंदर फोटो त्या आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. यावेळी त्या अनेक फिल्टरचा आधार घेत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका आघाडीच्या अभिनेत्रीच्या विना मेकअप फोटोची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ (Ileana D’Cruz) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपल्या कसदार अभिनयाने तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग भलामोठा आहे, ज्यांच्याशी ती नेहमी फोटो शेअर करत असते. आताही इलियानाने आपला एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. ज्यामधील तिच्या लुकची सध्या चर्चा होत आहे.

इलियानाने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये लाल रंगाची बिकीनी घालून ती खूपच हॉट दिसत आहे. परंतु या फोटोमध्ये तिचे वाढलेले वजन प्रकर्षाने दिसून येत आहे. मात्र या फोटोसोबत इलियानाने लिहलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या लाल बिकीनीमधील फोटोमध्ये इलियानाने कोणत्याही फिल्टरचा वापर केलेला नाही, ज्याचा उल्लेख तिने या कॅप्शनमध्ये केला आहे. सोबतच सगळे फिल्टर डिलीट केल्याचे ही तिने सांगितले आहे. तिच्या या पोस्टचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

तत्पूर्वी इलियाना Body Dysmorpic Disorder या आजाराची शिकार झाली होती. ज्यामुळे तिला त्रास सहन करावा लागला होता. यावेळी अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचेही विचार आले होते. या आजाराबद्दल बोलताना तिने सांगितले की “आपल्याला सगळ्याच गोष्टी परिपूर्ण मिळत नाहीत, त्यावेळी आपण अपूर्ण असल्याचं वाईट वाटून घेऊ नये.” दरम्यान इलियानाने रणबीर कपूरसोबत ‘बर्फी’ चित्रपटात काम केले होते. यामधील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याच बरोबर तिने अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ चित्रपटातही काम केले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा