Friday, March 29, 2024

मलायका अरोरा मुलगा अरहानसोबत दिसली स्टायलिश लूकमध्ये, चाहते म्हणाले ‘ही आई आहे की बहीण?’

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. त्याचबरोबर मलायका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मलायकाच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. मलायका फिटनेस फ्रिक देखील आहे. ज्यामुळे ती सतत चर्चेचा विषय बनत असते. मलायकाने या वयात ज्याप्रकारे स्वत:ला तंदुरुस्त ठेवलं आहे, त्यातून चाहत्यांना खूप प्रेरणा मिळते. मलायका सध्या तिचा मुलगा अरहान खानसोबत खूप चांगला वेळ घालवताना दिसत आहे. मलायकाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ मलायकाच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, प्रथम मलायका (Malaika Arora) तिच्या कारमधून खाली उतरते आणि नंतर तिचा मुलगा अरहान. दोघेही गाडीतून उतरतात आणि पटकन आपापल्या बिल्डिंगच्या गेटच्या आत जातात. यादरम्यान मलायका काही सेकंदांसाठी थांबते आणि पोझ देते. व्हिडिओमध्ये मलायकाने पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

व्हिडिओमध्ये मलायका इतकी तरूण आणि सुंदर दिसत आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी अरहानची आई नव्हे, तर त्याची मोठी बहिण म्हणून हाक मारायला सुरुवात केली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “ही त्याची आई कुठे दिसते, ही तर त्याची मोठी बहीण आहे.”

विशेष म्हणजे मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र हँग आउट करताना दिसले आहेत. चाहते अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप काहीही बोललेले नाही. अरबाज खानपासून (Arbaaz Khan) मलायकाचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता.

हेही वाचा :

वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी आजमवले नशीब, त्यानंतर मिळवले भरपूर काम

वहिनीसाहेबांनी मुलासोबत केला भन्नाट डान्स, धनश्री काडगावकरच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

मधुबालाच्या बहिणीला बाहेर काढल्यावर त्यांच्या मुलीने केला खुलासा म्हणाली, ‘ती आईला जेवायला देखील देत नव्हती’

हे देखील वाचा