Wednesday, June 12, 2024

इलियाना डिक्रुझने शेअर केली बाळाची पहिली झलक; गोंडस चेहरा पाहून हरपेल तुमचही भान

टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने 18 एप्रिल रोजी तिच्या प्रेगन्सीबद्दल सांगत चाहत्यांना धक्का दिला होता. लग्नापूर्वी इलियाना प्रेग्नेंट आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांंमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सर्वांना इलियानाच्या बाळाचा बाबा कोण आहे? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे. याबद्दल इलियानाने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
इलियाना सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या खाजगी आयुष्याविषयी माहिती देत असते. आता इलियानाने  (ileana d’cruz) चाहत्यांना आनंदाची बातमी देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने 1 ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शनिवारी ती एका मुलाची आई झाली आहे.
एक पोस्ट करत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने एक पोस्ट करत चाहत्यांना बाळाचा पहिला फोटो आणि नावही शेअर केलं आहे. इलियानावर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहीले की, “अभिनंदन!!! तुच अशी पहिली आहे जिने तिच्या नवजात बाळाचे फोटो दाखवले आहे. देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

ही पोस्ट करत तिने लिहिले की, “आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे हे कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय”. असं लिहीत तिने बाळाचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबतच त्याचं नावही लिहिलं आहे. तिच्या बाळाचं नाव आहे “कोआ” फिनिक्स डोलन आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.( actress ileana dcruz welcomes a baby boy names him koa phoenix dolan)

हे देखील वाचा