Saturday, December 7, 2024
Home मराठी कामाच्या स्पर्धेपेक्षाही मैत्री महत्वाची! ‘हे’ आहेत मराठीतील घट्ट कलाकार मित्र

कामाच्या स्पर्धेपेक्षाही मैत्री महत्वाची! ‘हे’ आहेत मराठीतील घट्ट कलाकार मित्र

मैत्री हे आपल्या आयुष्यातील एक अनमोल आणि महत्वाचे नाते आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी मित्र असतोच. मराठी सीनेसृष्टीत देखील असे अनेक कलाकार आहेत. जे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. आपल्याला असे वाटते की, कलाकार केवळ एकमेकांशी स्पर्धा करतात. परंतु मराठीमध्ये असे कलाकार आहेत जे एकत्र काम करून एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. आज (6 ऑगस्ट) रोजी नॅशनल मैत्री दिन साजरा होत आहेत. चला तर जाणून घेऊया असे कोणते कलाकार आहेत, जे एकमेकांचे जिवाभावाचे मित्र आहेत…

यातील पहिली जोडी म्हणजे सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि प्रिया बापट. (priya bapat) त्या दोघीनी वजनदार या चित्रपट काम केले आहे. त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे अनेक फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

स्वप्नील जोशी (swapnil joshi) आणि मुक्ता बर्वे (mukta barve) यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यातील त्यांचा मुंबईत पुणे मुंबईत हा चित्रपट चांगलाच गाजला. यानंतर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. त्यांची ऑफस्क्रीन बॉण्डिंगल देखील खूप चांगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

हेमंत ढोमे (hemant dhome) आणि सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. पुण्यात नाटकाच्या दरम्यान त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. आजही ते अनेक ठिकाणी एकत्र असतात. त्यांची मैत्री देखील अनेकांना आवडते.


सोनाली खरे (sonali khare) आणि अमृता खानविलकर (amruta khanvilkar) यांची जोडी देखील अनेकांना आवडते. त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे अनेक रिल्स आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnali K khare (@iamsonalikhare)

अनुजा साठे, अभिज्ञा भावे आणि रेशमा शिंदे या देखील खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. लगोरी या मालिकेतून त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. त्यांचे अनेक मजेशीर रिल्स व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी यांची जोडी देखील अनेकांना खूप आवडते. त्यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यानंतर ते खूप नावारूपाला आले.

हेही वाचा-
मैत्रीदिनी मित्राला भन्नाट डायलॉग मारायचाय?, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी, वाचा 31 डायलॉग एकाच क्लिकवर
दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांची मैत्री आहे सर्वात खास

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा