Thursday, November 13, 2025
Home मराठी ईशाबाई ‘सुपर’ जोरात! ईशा केसकरचे बीचवरील फोटो पाहून चाहते घायाळ, ग्लॅमरस लूक ठरतोय चर्चेचा विषय

ईशाबाई ‘सुपर’ जोरात! ईशा केसकरचे बीचवरील फोटो पाहून चाहते घायाळ, ग्लॅमरस लूक ठरतोय चर्चेचा विषय

टेलिव्हिजनवर कलाकार जी भूमिका निभावतात, तीच भूमिका आयुष्यभरासाठी त्यांच्या नावी होऊन जाते. मग ती नायकाची भूमिका असो किंवा खलनायकाची. प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. पण एका नायकाच्या भूमिकेतून थेट खलनायकाच्या भूमिकेत कलाकारांना स्वीकारण्यास प्रेक्षक काचकूच करतात. पण काही कलाकार असे असतात, जे प्रत्येक भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावतात. याला साजेसे असे उदाहरण म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर.

झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत बानूचे पात्र निभावून तिने प्रेक्षकांच्या मनात तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. पण त्यानंतर तिने काही दिवस ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया हे पात्र निभावले होते. या ग्लॅमरस भूमिकेत देखील प्रेक्षकांनी तिला खूप लवकर स्वीकारले. ईशा तिच्या खऱ्या आयुष्यात देखील ग्लॅमरस आहे. अशातच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (actress isha keskar share her beach photos on social media)

ईशाने नुकतेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही बीचवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी शॉर्ट ड्रेस घातला असून, ती पाण्यातून चालताना दिसत आहे. यामध्ये तिने तिचे सगळे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तिचे चाहते या फोटोवर अनेक कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “ईशाबाई खूपच जोरात आहेत.” तसेच आणखी एका चाहत्याने “सुपर” अशी कमेंट केली आहे. यासोबत बाकी अनेकजण हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

ऋषी सक्सेना आणि ईशा मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऋषीने या आधी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. या मालिकेत त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत सायली संजीव होती. या मालिकेतील त्यांची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा