बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरचे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ठग सुकेश चंद्रशेखर तिला किस करताना दिसत आहे. जॅकलिनचा हा फोटो समोर आल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. त्यामुळे अभिनेत्री नाराज झाली असून, तिने चाहत्यांना खास आवाहन केले आहे आणि तिला ट्रोल करू नका असे सांगितले आहे. ती म्हणते की, ती खूप वाईट टप्प्यातून जात आहे. तिने लोकांना तिची गोपनीयता राखण्याचे आवाहन केले आहे आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, असेही सांगितले आहे.
जॅकलिनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनात लिहिले आहे की, “या देशाने आणि या देशातील लोकांनी मला नेहमीच खूप आणि अमर्याद प्रेम दिले आहे. यामध्ये मीडियातील माझ्या मित्रांचा समावेश आहे ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे. सध्या मी खूप वाईट काळातून जात आहे. मला आशा आहे की, मी लवकरच यातून बाहेर पडताना पाहाल. माझ्या मीडिया मित्रांना माझी विनंती आहे की, माझ्या गोपनीयतेची काळजी घ्यावी.”
Affair pics LEAKED: #JacquelineFernandez's romantic pics with conman #SukeshChandrasekhar goes VIRAL!@Asli_Jacqueline pic.twitter.com/RKPBsFYNMa
— ????Kinng Jong???? (@OMG_Its_Kinng) January 8, 2022
जॅकलिनने तिच्या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिले आहे की, “सोशल मीडियावर माझे वैयक्तिक फोटो प्रसारित करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना हे करू शकत नाही. मला आशा आहे की, तुम्ही माझ्याशी असे वागणार नाही. मला आशा आहे की, न्याय होईल आणि तुम्ही ते चांगल्या दृष्टिकोनातून घ्याल, धन्यवाद.”
सुकेशने जॅकलिनला दिल्या महागड्या भेटवस्तू
मनी लाँड्रिंग २०० कोटी रुपयांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ठग सुकेश चंद्रशेखरच्या चौकशीदरम्यान जॅकलिनचे नाव समोर आले. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत.
जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध एलओसी जारी
अंमलबजावणी संचालनालयाने ५ डिसेंबर रोजी जॅकलिनविरुद्ध एलओसी जारी केली होती. लूकआऊट नोटीसमुळे अभिनेत्रीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर थांबवले. त्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मस्कतला जात असताना तिला चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले.
हेही नक्की वाचा-