Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. जॅकलिनला स्वतःला सोशल मीडियावर सक्रिय ठेवणे आवडते. ती अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिच्या फोटोशूटमधील फोटो शेअर करताना दिसते.  नुकतच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे

या फोटोंमध्ये जॅकलिन एका काळ्या रंगाच्या ब्रालेट को-ऑर्ड ऑफ फायर पॅटर्नसह दिसत आहे. तिने या आकर्षक ड्रेससह काळ्या रंगाच्या हाय हिल लेदरचे बूटही घातले आहेत. डार्क लिपस्टिकसह तिने कॅमेऱ्यासमोर लक्षवेधी पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. साडेआठ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंना पसंती दिली आहे. तसेच, बॉलिवूड कलाकार प्रतिक्रिया करत तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.

अलीकडेच ती ‘भूत पोलीस’ या चित्रपटात दिसली होती. २०२२ पर्यंत तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होतील. जॅकलिन तिच्या बिझी शेड्यूलमुळे चर्चेत राहिली आहे. त्यामध्ये ‘सर्कस’, ‘किक २’, ‘बच्चन पांडे’, ‘राम सेतू’ आणि ‘अटॅक’ यांचा समावेश आहे. जॅकलिनकडे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्यांची अद्याप घोषणा झालेली नाही. जॅकलिनच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल चाहते खूप उत्साहित आहेत.

यापूर्वी तिने गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या फाउंडेशनसह मुंबईमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. ज्यात तिने आपल्या टीम आणि लोकांसह समुद्र किनारा स्वच्छ केला. फाउंडेशनने चालवलेल्या स्वच्छता मोहिमेचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री कोव्हिड -१९ प्रोटोकॉलचे पालन करून स्वच्छता करताना दिसत आहे.

याशिवाय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकलिनने सांगितले की, जेव्हा ती शूटिंग संपवून मोकळी होते, तेव्हा ती घरातून बाहेर जात नाही. जॅकलिन म्हणाली की, “जेव्हा मी पॉज बटण दाबते, म्हणजे जेव्हा मी कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग करत नाही. त्यावेळी मी ट्रेनिंग घेते. जेव्हा मी माझी ट्रेनिंग घेत असते तेव्हा मी वर्कशॉप करते. विश्रांतीसाठी एक दिवस सुट्टी घेण्यापेक्षा मी एक कलाकार म्हणून स्वतःला सुधारण्यासाठी माझा वेळ वापरणे पसंत करते.”

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत ‘अटॅक’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…

आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

यूरोपच्या जंगलांमध्ये बंडखोरीच्या प्रयत्नात दिसला अभिनेता विकी कौशल, फोटो व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा