खाजगी फोटो लीक झाल्यानंतर जॅकलिनचा व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले ‘सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड…’

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या २०० कोटींच्या कॅश लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या कथित संबंधांमुळे चर्चेत आहे. अलिकडे, अभिनेत्रीचे ठग सुकेशसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यानंतर, अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना स्पष्ट केले आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले. अशा परिस्थितीत आता जॅकलिनच्या बॉडीगार्डचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, युजर्स जॅकलिनला ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

इंस्टाग्रामवर जॅकलिनचा (Jacqueline Fernandez) एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायराल भयानीने शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिचा लाल ड्रेस फ्लॉंट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्याकडे हसत हसत फ्लाइंग किस देत आहे आणि यामध्ये तिचा बॉडीगार्डही तिच्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने अभिनेत्रीला टार्गेट करायला सुरुवात केली.

अशा आल्या युजर्सच्या प्रतिक्रिया

एका महिला युजरने अभिनेत्रीवर आरोप केला की, “जॅकलिन पैसे घेऊन तिची इमेज सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.” त्याचवेळी, दुसर्‍याने तिच्या बॉडीगार्डची तुलना तिच्या कथित बॉयफ्रेंडशी केली आणि म्हटले की, “सुकेशपेक्षा तिचा बॉडीगार्ड चांगला आहे. सुकेश कुठे गेला, तो दिसत नाही.” त्याचबरोबर काही चाहत्यांनी अभिनेत्रीच्या स्माईल आणि तिच्या लूकचे कौतुकही केले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सुकेशवर आहे फसवणुकीचा आरोप 

सुकेश चंद्रशेखर हा ठग असून, त्याच्यावर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, जॅकलिन आणि सुकेश बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अलिकडेच दोघांचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या गळ्यावर लव्ह बाइट दिसत होते.

 जॅकलिनने केले आवाहन

सुकेशसोबतच्या तिच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देताना जॅकलिन सोशल मीडियावर म्हणाली की, “सोशल मीडियावर माझे वैयक्तिक फोटो प्रसारित करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना हे करू शकत नाही. मला आशा आहे की, तुम्ही माझ्याशी असे वागणार नाही. मला आशा आहे की, न्याय होईल आणि तुम्ही ते चांगल्या दृष्टिकोनातून घ्याल, धन्यवाद.”

सुकेशने जॅकलिनला दिल्या महागड्या भेटवस्तू 

कथित मनी लाँड्रिंग २०० कोटी रुपयांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ठग सुकेश चंद्रशेखरच्या चौकशीदरम्यान जॅकलिनचे नाव समोर आले. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत.

हेही वाचा :

Latest Post