सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरण, जॅकलिन फर्नांडिसची कोट्यवधींची संपत्ती ईडी करणार जप्त?


सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिनवर कोट्यवधी रुपये खर्च केले. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय करत असून, सुकेश मनी लाँड्रिंग प्रकरण २०० कोटी रुपयांचे आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, जॅकलिनला सुकेश यांच्याकडून मिळालेल्या सर्व भेटवस्तू जप्त करण्याच्या प्रक्रियेत ईडी आहे.

जॅकलिनला (Jacqueline Fernandes) डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान सुकेश यांच्याकडून १० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्यांनी जॅकलिनला हिऱ्यांचे दोन कानातले, दोन ब्रेसलेट, लुई बटन शूज, ९ लाख किमतीच्या चार मांजरी आणि ५६ लाख किमतीचे घोडे या वस्तू भेट दिल्या आहेत. तर सुकेश यांनी नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कारही भेट दिली आहे, ती देखील अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात येणार आहे.

जॅकलिन फर्नांडिस २०१७ पासून सुकेश चंद्रशेखर यांच्या आहे संपर्कात

अंमलबजावणी संचालनालयाला दिलेल्या निवेदनात जॅकलिनने सांगितले की, ती २०१७ पासून सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आहे आणि त्यांनी स्वत:ची ओळख दिवंगत जयललिता यांचे कुटुंबीय म्हणून करून दिली आहे. जॅकलिन म्हणते की, “मी फेब्रुवारी २०१७ पासून सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आहे आणि त्यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी मला सांगितले की, ते सन टीव्हीचे मालक आहेत आणि जयललिता यांच्या कुटुंबातील आहेत,” असेही आरोपपत्रात लिहिले आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या बहिणीने सुकेश चंद्रशेखरकडून १.५ लाख डॉलर्सचे घेतले आहे कर्ज

तिच्या बहिणीने सुकेश यांच्याकडून दीड लाख डॉलर्सचे कर्ज घेतल्याचेही जॅकलिनने सांगितले. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तिच्या भावाच्या खात्यात १५ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचेही तिने मान्य केले. बॉलिवूडमधील १० कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर यांचा संबंध आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी आणि हरमन बावेजा यांचा समावेश आहे. सुकेश यांनी ईडीला सांगितले की, ते हरमन बावेजाला ओळखतात आणि त्यांना त्याचा चित्रपट बनवायचा होता. त्याने असेही सांगितले की, ते शिल्पा शेट्टीच्या पतीची तुरुंगातून सोडण्यासाठी तिच्या संपर्कात आले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!