साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ओपनिंगमध्येच उडवला धुरळा, ‘थालापती’ विजयच्या ‘मास्टर’चाही समावेश


दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा: द राइज‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाच्या रेकॉर्डब्रेक कमाईवरून असा अंदाज लावता येतो की, या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अल्लू अभिनित ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने ट्रेड ऍनालिस्टलाही आश्चर्यचकित केले आहे.

हा चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, तर देशभरात खूप पसंत केला जात आहे. हा चित्रपट देशभरात चांगली कमाई करत आहे. मात्र, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेला हा एकमेव साऊथचा चित्रपट नाही. याआधीही साऊथच्या अनेक चित्रपटांनी यावर्षी ओपनिंगमध्ये चांगली कमाई केली होती. चला तर मग अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

वकील साब
पवन कल्याण (Pawan Kalyan) या अभिनेत्याच्या ‘वकील साब’ या चित्रपटाने चित्रपटगृहामध्ये धमाल केली होती. कोरोनाच्या काळात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई केली होती.

मास्टर
थालापती विजय (Thalapati Vijay) या अभिनेत्याचा ‘मास्टर’ हा चित्रपट २०२१ मधील दुसरा सर्वात मोठा साऊथ ओपनर ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ५० कोटींची कमाई केली होती.

पुष्पा
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) अभिनित फिल्म पुष्पाने पहिल्याच दिवशी एकूण ४८ कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

अन्नाथे
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा यावर्षी प्रदर्शित झालेला ‘अन्नाथे’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३४.९२ कोटींची कमाई केली होती.

अखंडा
नंदामुरी बालकृष्णन (Nandamuri Balakrishna) यांच्या ‘अखंडा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता.

या चित्रपटाने ओपनिंगमध्ये २३ कोटींची कमाई केली होती.

हेही नक्की वाचा-


Latest Post

error: Content is protected !!