Tuesday, October 28, 2025
Home बॉलीवूड ‘अगं तुझा ड्रेस फाटलाय!’ जॅकलिन फर्नांडिसने सेल्फी शेअर करताच, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

‘अगं तुझा ड्रेस फाटलाय!’ जॅकलिन फर्नांडिसने सेल्फी शेअर करताच, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. जॅकलीनला स्वतःला सक्रिय ठेवणे आवडते. ती अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचे फोटोशूट करत असते. चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओमध्येही दिसते.

सोशल मीडियावरही जॅकलिनची चांगलीच फॅन फॉलोविंग आहे. दरम्यान, तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा विचित्र अवतार पाहायला मिळत आहे. यामुळे चाहत्यांचे चेहऱ्यापेक्षा तिच्या कपड्यांवर जास्त लक्ष गेले आहे. तिने या फोटोंमध्ये फाटलेला ड्रेस घातला आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जॅकलिन फर्नांडिसने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने “मॅम तुमचा ड्रेस फाटला आहे” असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का.” ५४.९ मिलियन अधिक युजर्स इंस्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिसला फॉलो करतात.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जॅकलिन फर्नांडिस अलीकडेच ‘भूत पोलिस’ या कॉमेडी हॉरर चित्रपटात दिसली होती. तिच्याशिवाय यामी गौतम, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर देखील या चित्रपटात दिसले होते. जॅकलिन लवकरच ‘किक २’ मध्ये सलमान खान, रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि बच्चन पांडेसोबत दिसणार आहे. जॅकलिन फर्नांडिस ‘हाऊसफुल ३’, ‘रेस ३’, ‘ड्राईव्ह’, ‘रॉय’ आणि ‘ब्रदर्स’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते.

लवकरच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत ‘अटॅक’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! नोरा अन् जॅकलिनला ‘या’ व्यक्तीने केली होती लक्झरी कार गिफ्ट, दोन बंगलेही…

-आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा