काय सांगता! नोरा अन् जॅकलिनला ‘या’ व्यक्तीने केली होती लक्झरी कार गिफ्ट, दोन बंगलेही…

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर याच्या विरोधात २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने सोमवारी (१८ ऑक्टोबर) पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले होते. परंतु तरीही ती हजर झाली नाही. तिने हजर न राहण्याचे कारण देखील सांगितले आहे. याच प्रकरणाबाबत अभिनेत्री नोरा फतेही हिची देखील गुरुवारी (१४ ऑक्टोबर) रोजी तपासणी करण्यात आली होती. अशातच याबाबत अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

असे म्हटले जात आहे की, तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला एक महागडी गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, त्याने नोरा फतेहीला देखील एक महागडी गाडी गिफ्ट केली होती. तसेच सुकेश‌ या दोन अभिनेत्रींना दोन मोठे बंगले भेट देण्याच्या तयारीत होता. अशातच ईडीने या दोन अभिनेत्रींना चौकशी करण्यासाठी बोलावत आहेत. (Money laundering case Jacqueline Fernandez, nora fatehi were gifted luxury cars by accused Sukesh chandrashekhar)

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

यासोबतच सुकेशने साजिद नाडियावालांना काही पैसे देण्याचा शब्द दिला होता. ईडीच्या माहितीनुसार, सुकेशची पत्नी आणि मल्याळम अभिनेत्री लीना पॉलला बॉलिवूड चित्रपटात लॉन्च करायचे होते. ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात तिला सुकेशने खूप मोठी रक्कम देऊन रोल दिला होता.

सुकेश चंद्रशेखरने त्याच्या पत्नीला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत बोलणे केले होते.‌ तसेच या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पैशाचे काही टेन्शन घेऊ नका, असे देखील सांगितले होते. सुकेशने तिहार तुरुंगात आरामशीर राहण्यासाठी कोटी रुपये खर्च केले होते. आता सुकेश आणि त्याची पत्नी ईडी रिमांडमध्ये आहेत.

सुकेशला याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये ईडीने अटक केली आहे. सुकेशवर जेलमध्ये बसून २०० कोटी रुपयांच्या वसुलीचा मोठा रॅकेट चालवण्याचा आरोप लागला आहे. पोलिसांनी जेव्हा या गोष्टीची तपासणी केली, तेव्हा त्याच्या जवळ दोन मोबाईल मिळाले होते. सुकेशची पत्नी देखील या प्रकरणात जेलमध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

Latest Post