Monday, July 8, 2024

जॅकलिन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोशूटने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, फोटो तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. तिला स्वतःला व्यस्त ठेवणे आवडते. ती अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचे फोटोशूट शेअर करत असते. चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओमध्येही दिसते. जॅकलिनने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे. जॅकलिनचे पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. जॅकलिन तिच्या ग्लॅमरस लूकमुळे अनेकदा चर्चेत असते, या फोटोंमध्ये पुन्हा एकदा तिची स्टाईल पाहायला मिळत आहे.

ग्लॅमरस फोटोंना मिळत आहे पसंती
जॅकलिनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिनने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, जो सेमी पारदर्शक आहे. या ड्रेसमध्ये जॅकलिनची वेल टोन्ड बॉडी दिसून येत आहे. पहिल्या फोटोत जॅकलिन बसून केसांवर हात ठेवून अतिशय मनमोहक स्टाईलमध्ये पोझ देत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोत ती खाली बसली आहे आणि तिचे केस मागे ठेवून पोझ देत आहे. या फोटोत ती तिचा पांढरा बूट फ्लॉंट करत आहे. तिसऱ्या फोटोत जॅकलिन गुडघ्यावर बसून पोझ देत आहे. तिन्ही फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. जॅकलिनच्या फोटोशूटच्या या फोटोंवर ‘स्टनिंग’ आणि ‘ब्युटी क्वीन’ अशा कमेंट करून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

त्याचबरोबर तिच्या या फोटोंना चाहत्यांनी एवढी पसंती दिली आहे की, आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

यामुळे’ जॅकलिन असते चर्चेत
जॅकलिनला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. नुकताच जॅकलिनने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिची फाटलेली ब्रा दिसत होती, या फोटोमुळे जॅकलिनला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.

चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर जॅकलिन यावर्षी ‘भूत पोलिस’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. आगामी काळात जॅकलिन ‘बच्चन पांडे’, ‘अटॅक’, ‘सर्कस’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यातील काही चित्रपटांचे चित्रीकरण अद्याप सुरू आहे, तर काहींचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये उर्फी दिसतेय एकदम स्टनिंग, तुम्ही पाहिला का फोटो?

-जाळ अन् धूर संगटच! नोराच्या ग्लॅमरस फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग, पडतोय लाईक्सचा पाऊस

-स्वत:चा जुना फोटो शेअर करत अनुपम यांनी नेटकऱ्यांना विचारला ‘हा’ प्रश्न, चाहते म्हणाले…

हे देखील वाचा