स्वत:चा जुना फोटो शेअर करत अनुपम यांनी नेटकऱ्यांना विचारला ‘हा’ प्रश्न, चाहते म्हणाले…


बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांना कोड्यात पाडत असतात. म्हणजेच त्यांचे वेगवेगळे फोटो शेअर करून ते चाहत्यांना कोणते आहेत हे विचारत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर करून चाहत्यांना असे काही विचारले आहे की, त्यांनी त्यांचा शेअर केलेला फोटो कोणत्या चित्रपटातील आहे.

अनुपम खेर यांनी विचारले, ‘हा फोटो कोणत्या चित्रपटातील आहे?’
खरं तर, अनुपम यांनी इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना विचारले आहे की, हा फोटो कोणत्या चित्रपटातील आहे. त्यांनी लिहिले आहे की, “हा फोटो कोणत्या चित्रपटातील आहे हे मला आठवत नाही.” खेर यांनी चाहत्यांना सांगितले की, जर ज्या लोकांना हे माहित असेल, तर त्यांनी उत्तर द्या.

खेर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला माहित नाही की, एका चित्रपटातील माझा हा फोटो माझ्यापर्यंत कसा पोहोचला? मला कल्पना नाही की, हा कोणता चित्रपट आहे? हा मला वेड लावत आहे. जर कोणाला याबद्दल माहिती असेल तर सांगा.”

चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “अनुपम खेर यांचा हा फोटो कोणत्या चित्रपटातील आहे हे त्यांना आठवत नाही, पण त्यांचा हा फोटो दिवंगत अभिनेते गुरु दत्त यांची आठवण करून देतो.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “सर, तुम्ही गुरुदत्त साहेबांची कॉपी आहात असे वाटते.” त्यांच्या या फोटोचे अनेक चाहते कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “हे त्यांच्या पहिल्या चित्रपटातील एक फोटो असेल.”

अनुपम खेर यांचे चाहते त्यांच्या वेगळ्या चित्रपटांतील फोटो असल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत २४ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे. त्यासह ते सतत कमेंट देखील करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे


Latest Post

error: Content is protected !!