बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या मनी लॉन्ड्रिंगमुळे चर्चेत आहे. अलीकडेच जॅकलिनची दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँच ईओडब्ल्यूने चौकशी केली, ज्यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. या सगळ्याशिवाय आता अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेतं आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री एका कार्यक्रमात पॅपराझींना पोज देताना दिसत आहे. मात्र, लोकांना अभिनेत्रीची ही शैली आवडली नाही आणि लोक तिच्या व्हिडिओवर नकाे त्या कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
त्याचवेळी एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “काळ्या पैशासह पांढरी हिरोईन.” तर दुसर्या यूजरने कमेंट करत लिहिले की, “हिला श्रीलंकेला परत पाठवा.” याव्यतिरिक्त इतर युजर्सही व्हिडिओवर अश्लील कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीला ट्राेल करत आहेत.
सुकेशने जॅकलीनला अनेक कोटींचे महागडे गिफ्ट्स दिले हाेते. यामध्ये दागिने, घोडा आणि कार इत्यादींचा समावेश आहे. तसेच, अनेक माध्यमांतील वृत्तानुसार असा दावा करण्यात आला आहे की, सुकेशने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना अनेक मौल्यवान भेटवस्तू देखील दिल्या आहेत. सुकेशने अदिती सिंग आणि बहिणीला फोनवरून स्वत:ची केंद्रीय गृहसचिव आणि कायदा सचिव म्हणून ओळख करून दिल्याचा आरोप आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. त्यांचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा विनोदी चित्रपट 1975 च्या अंगूर चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘इमली’ फेम फहमान खानने शालिन आणि सुंबुलच्या नात्यावर व्यक्त केली नाराजी, म्हणाला ती एक..
ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’










