ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’


बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्डा आणि तिचा बॉयफ्रेंड तसेच अभिनेता असलेला अली फजल हे नेहमीच त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील ते दोघे त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात. ऋचा आणि अली हे दोघे २०२० मध्येच लग्न करणार होते, परंतु कोरोना विषाणूमुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले होते. मात्र, आता ते पुन्हा एकदा त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. नुकतेच सिद्धार्थ कननसोबत बोलताना अली फजलने त्यांच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

त्याने सांगितले की, आता त्याच्या आणि ऋचाच्या लग्नाला काहीही घाई नाहीये. त्यांना लग्नाच्या आधी खूप पैसा कमवायचा आहे. त्याला लग्नाबाबत विचारल्यावर त्याने सांगितले की, ते दोघे लग्न करणार आहेत आणि लवकरच करणार आहेत. परंतु त्या आधी ते पैसा कमवू इच्छितात. २०२० हे वर्ष अली फजलसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होते. या वर्षी त्याने त्याच्या आई आणि आजीला गमावले आहे. (Ali fazal open up on marriage with richa chadda)

अलीने पुढे सांगितले की, “मागील वर्ष सगळ्यांसाठी खूप विचित्र होते. ही गोष्ट तर सर्वांना माहीत आहे. माझ्या परिवारात मी अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. आमच्या वैयक्तिक आयुष्यात एवढं काही झाल्यानंतर आता आम्ही हा निर्णय घेतला आहे की, आम्ही आमचे लग्न सगळ्यांच्या उपस्थितीत करणार आहोत. खूप चांगले रिसेप्शन देणार आहोत. मला नाही माहित या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत. मग विचार केला आधी थोडे पैसे कमवावे. काम बंद केले, तर सेलिब्रेट करायला पैसे नको का??”

याआधी अली फजलने इंस्टाग्रामवर त्याची गर्लफ्रेंड ऋचा चड्डासोबत एक फोटो शेअर केला होता. ते दोघेही कोणत्यातरी इव्हेंटमध्ये दिसत होते. हा फोटो शेअर करून त्याने ऋचा चड्डाला ‘बेगम’ असे म्हटले होते. यावरून युजर असा अंदाज लावत होते की, त्या दोघांनी कोणालाही न सांगता लग्न केले की काय? एवढंच काय, तर अनेक युजरने कमेंट करून त्या दोघांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नीतू कपूर सूनेला ठेवतील एखाद्या ‘राणीप्रमाणे’; रिद्धिमा कपूरने सांगितले कसे असेल सासू-सूनेचे नाते

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा

-चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी


Leave A Reply

Your email address will not be published.